Share

संतोष बांगर यांचा आदेश शिवसैनिकांनी धुडकावला; वाचा नेमकं काय घडलं?

santosha Bangar

शिवसेनेसोबत गद्दारी करून एकनाथ गटाला समर्थन दिले, म्हणून संतोष बांगर यांच्यावर पक्षाने नुकतीच मोठी कारवाई केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांची थेट जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली. त्यानंतर बांगर आणि शिवसेना यांच्यात वाद विकोपाला गेला.

तर आता संतोष बांगर यांचा आदेश शिवसैनिकांनी धुडकावला असल्याच पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील आगांमी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बांगर हे सध्या चांगलेच सक्रिय झाले आहेत. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी शिंदे गटाने आयोजित केली होती.

मात्र बांगर यांचा आदेश शिवसैनिकांनी धुडकावला. शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी याबाबत पदाधिकाऱ्यांना उपस्थित न राहण्याच आवाहन केलं आहे. जिल्ह्यातील शिवसैनिकांची कोणत्याही प्रकारची बैठक आयोजित केली नाही. यामुळे कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी आजच्या बैठकीला उपस्थित राहू नये, असे आवाहन जाधव यांनी केले.

दरम्यान, ‘मला मुख्यमंत्री शिंदेंनीच सांगितलं आहे की, तुच हिंगोली सेनेचा जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे कोणत्याही पदाधिकाऱ्याला काढण्याचा अधिकार कोणालाही नसल्याच बांगर यांनी सांगितलं होतं. सोबतच त्यांनी शिवसेनेला  मुंबईत शक्तिप्रदर्शन करण्याचे आव्हान बांगर यांनी दिले होते.

काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंना आव्हान देण्यासाठी मुंबईकडे निघालेल्या संतोष बांगरांकडे शिवसैनिकांनीच पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे आता उद्धव ठाकरेंपाठोपाठ शिवसैनिक देखील संतोष बांगरांवर नाराज असल्याच पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
“आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग…”, मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
शिवसेनेच्या आंदोलनात लहान मुलांना पाहून भाजपने लगावला टोला, म्हणाले, शिल्लक सेनेकडे…
तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
आमदारांपाठोपाठ खासदारांचाही उद्धव ठाकरेंना धक्का, उचललं मोठं पाऊल, शिवसेनेचं काय होणार?

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now