राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच आता बंड केलेल्या नाराज आमदारांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेना खासदार यांनी नुकताच केलेला एक दावा खोडून काढला आहे.
नुकताच संजय राऊत यांनी ‘शिवसेना आमदार यांना मारहाण करून सोबत नेल्याचा,’ आरोप केला होता. राऊत यांच्या या आरोपांवर आता थेट शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. ‘ते आमदार आहेत त्यांना कसे मारहाण केली जाऊ शकते. लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे त्यांना कोण का मारहाण करेल? असा प्रतीप्रश्न शिरसाट यांनी राऊत यांना केला आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर नाराजी असताना अडीच वर्षे गप्प का? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना शिरसाट यांनी म्हंटलं आहे की, सत्ता आल्यावर कोरोनाचा काळ गेला, त्यानंतर उद्धव ठाकरेंची तब्येत बिघडली. यामुळे असे निर्णय घेणे योग्य नव्हते.’
दरम्यान, आमची नेतृत्वावर नाराजी नसून आमची राष्ट्रवादी-काँग्रेसवर नाराजी असल्याच शिरसाट म्हणाले आहे. तर दुसरीकडे या बंडखोर आमदारांसोबत ‘प्रहार’चे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू देखील आहेत. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर बच्चू कडू यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला फोवरून माहिती दिली आहे.
यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी सांगितलं आहे की, ‘मी स्वत: मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. ‘मी राज्यसभा आणि विधान परिषदेलाही तुम्हाला मतदान केलं. पण अचानक हे वातावरण तयार झालं आणि मी आज इथं आहे असं त्यांना मी फोवर सांगितलं असल्याच कडू यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
तसेच मुख्यमंत्र्यांनी ‘तुम्ही परत या..’ असं आवाहन केलं. पण तोवर सगळं पाणी डोक्यावरुन गेलं आहे”, असं कडू स्पष्टच सांगितलं. याचबरोबर सर्व आमदार स्वखुशीनं इथं आले आहेत आणि सर्व आनंदी आहेत, असे देखील कडू यांनी सांगितलं आहे. याचबरोबर शिंदे यांच्या गटाला असलेलं समर्थन हे ५० आमदारांपर्यंत पोहोचेल असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
ठाकरे सरकार कोसळणार? ‘संपर्कात रहा! कोणत्याही क्षणी मुंबईत यावे लागेल,’ भाजपाचे आमदारांना तातडीचे आदेश
शिवसेनेला धक्का! उद्धव ठाकरेंच्या सर्वात जवळचा आमदार शिंदेंच्या गोटात; रात्रीतून सुरतला पलायन
भाजपकडून राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा; कोण आहेत द्रौपदी मुर्मू? जाणून घ्या..
गुजरातला गेल्यानंतर एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच साधला पत्रकारांशी संवाद, पहा नक्की काय म्हणाले?