Share

‘या’ शिवसेना नेत्याने मनोहर जोशींचं घर जाळण्याचे आदेश दिले; सदा सरवणकारांचा गौप्यस्फोट

सध्या राजकीय वर्तुळात अनेक नाट्यमय घटना घडत आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार पक्षनेतृत्वाच्या विरोधात जात गुवाहाटीला पोहचले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नकोच अशी भूमिका या आमदारांनी घेतली आहे.

शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला एकूण ५१ आमदार असल्याने राज्यातील महाविकास आघाडीसरकार अल्पमतात आल्याचं चित्र आहे. शिंदे गट आणि शिवसेना आता आमनेसामने आली आहे. शिवसेनेतील नेते मंडळी आता एकमेकांवर जहरी शब्दात टीका करताना पाहायला मिळत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत तर बंडखोरांवर सातत्याने टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी बंडखोर शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. याचाच धागा पकडत सरवणकर यांनी आता थेट राऊत यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत.

राऊत यांच्यावर आरोप करताना सरवणकर यांनी म्हंटलं आहे की, मातोश्री ज्यावेळी अडचणीत येते त्यावेळी असेल त्या ठिकाणाहून आम्ही शिवसैनिक घेऊन हजर राहायचो. ज्या राऊत सामना कार्यालयात बसतात ते कार्यालय आम्ही बांधले आहे. या राऊतांनी मनोहर जोशींच घर जाळण्यासाठी आम्हाला आदेश दिल्याचाही गंभीर आरोप देखील त्यांनी केलाआहे.

दरम्यान, ‘आम्ही सत्तेत असुनही आमच्या कामासाठी मंत्र्यांच्या पाया पडावे लागायचे. राष्ट्रवादीचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तर त्यांच्याकडे असलेल्या मंत्रीमंडळाचा मोठा गैरकारभार केला असल्याचा खळबळजनक आरोप सदा सरवणकर यांनी केला आहे.

यामुळे आता राजकीय वातावरण तापलेलं असतानाच सदा सरवणकर यांनी केलेल्या आरोपणमुळे आणखी खळबळ उडाली आहे. सदा सरवणकर यांनी केलेल्या आरोपांवर आता शिवसेना खासदार संजय राऊत नेमकी काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे आता महत्त्वाच ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
पुरुषांच्या ‘या’ पाच वाईट सवयींमुळे कमी होतो sperm count ! जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती
सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची धडपड! फडणवीसांना दोन वेळा फोन; वाचा नेमकं काय घडलं
जसास तसे! शिकाऱ्याने अस्वलाला मारली गोळी, मरण्यापुर्वी अस्वलाने ‘असा’ घेतला बदला; वाचून थक्क व्हाल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now