सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप – सेना यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. विधानसभेत देखील भाजप विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगताना पाहायला मिळत आहे. अशातच गुरुवारी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्हच्या माध्यमातून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
फडणवीसांनी विधानसभेत एका नव्या पेनड्राईव्हचा उल्लेख केला असून त्यामध्ये मुंबईचे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राऊत याबाबत माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले की, माझ्या नागपूर दौऱ्याची पोटदुखी ही पेनड्राईव्हच्यामार्फत निघत आहे. नागपूर दौऱ्यानंतर पेन ड्राईव्ह बाळंत झाले आहेत. पुढे राऊतांनी म्हटलं आहे की, त्यांच्या घरात रोज पेन ड्राईव्ह बाळंत होतात का बघावे लागेल. हा पेन ड्राईव्ह, तो पेनड्राईव्ह, आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारु, असं ते म्हणाले.
तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शत्रूशी सन्मानाने वागायचा सल्ला दिला होता.आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहे का?, असा सवालही राऊत यांनी उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला. केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षांची हात मिळवणी चालू असल्याचे देखील राऊत म्हणाले.
तसेच यातून असे दिसून येत आहे की महाराष्ट्रातील सरकार चालू द्यायचे नाही आहे. खोट्या प्रकरणातून हे सरकार उध्वस्त करायचे आहे, असे म्हणत राऊत यांनी भाजपला लक्ष केले. पुढे बोलताना राऊत म्हणाले, ‘याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू असं चाललंय.’
‘एकदा त्यांनी ज्यांना ज्यांना तुरुंगात पाठवायचंय, त्यांची एक यादी तयार करा. ती केंद्रीय तपास यंत्रणांना देऊन सांगा की या २५ लोकांना तुरुंगात टाकायचंय. आम्हाला आधी तुरुंगात टाका आणि मग आरोप करा, तुमचा जो महाराष्ट्रद्रोही आत्मा आहे, तो शांत करा”, अशा स्पष्ट शब्दात राऊत भाजपवर कडाडले.
महत्त्वाच्या बातम्या
‘द काश्मीर फाइल्स’ विरोधात कमेंट करणं बँक मॅनेजरला भोवलं, संतप्त नागरिकांनी उचललं टोकाचं पाऊल
नारायण राणे यांचा थेट उद्धव ठाकरेंना फोन, मुख्यमंत्री म्हणाले, ‘तुम्ही कधीही कॉल करा पण…’
‘त्या’ रुग्णालयात माझ्या हत्येचा कट रचला होता पण..; नितेश राणेंच्या वक्तव्याने खळबळ
नात्याला काळीमा फासणारी घटना! फिरायला चल असं सांगून गर्भवती पत्नीला बाहेर नेलं अन्.., वाचून हादराल