फेसबुक पोस्ट करत तृप्ती देसाई यांनी राज्यसभा निवडणूकीच्या निकालावर भाष्य केलं आहे. फेसबुक पोस्टमध्ये तृप्ती देसाई म्हणतात, ‘काही पुढारी विकले गेले, परंतु कोल्हापुरातील जनता विकली जाणार नाही,तुमच्या पाठीशी राहील,’ असं तृप्ती देसाई यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
तृप्ती देसाई यांच्या वक्तव्यावर अद्याप राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीये, मात्र खळबळ मात्र नक्कीच उडाली आहे. या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीन तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यसभा निवडणूकीत पुन्हा एकदा फडणवीसांची खेळी यशस्वी ठरली आहे.
महाविकास आघाडीची ९ मते फुटली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पहिल्या पसंतीची २७ मते ही धनंजय महाडिक यांना मिळाली आहे. तर धनंजय महाडिक यांच्याविरोधात असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना ३३ मते मिळाली आहे. या निवडणुकीत संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दरम्यान, सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. अशातच आता तृप्ती देसाई यांनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेचा विषय बनला आहे. या पोस्टची सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे.