Share

शिंदेंची बाजू घेणाऱ्या गोगावलेंना किशोरी पेडणेकरांनी ठणकावले; आॅडीओ क्लिप व्हायरल

kishori

शिनसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तर दुसरीकडे आमदार भरत गोगावले आणि मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर हे एकमेकांच्या आमनेसामने आले आहेत. सध्या राज्यात वर्तुळात गोगावले आणि किशोरी पेडणेकर यांच्यातील वादाची चर्चा सुरू आहे.

वाचा नेमकं घडलं काय..?
नुकताच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व उपनेते, जिल्हा प्रमुख यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी थेट बंडखोर आमदारांनाच लक्ष केलं. ‘माझ्या फोटोशिवाय आणि शिवसेनेच्या नावाशिवाय जगून दाखवा, असे आव्हान ठाकरेंनी बंडखोरी केलेल्यांना दिले.

तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर आमदार भरत गोगावले भाष्य केले. गोगावले यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष करत धारेवर धरले. याबाबत माध्यमांशी बोलताना गोगावले यांनी म्हंटले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याननंतर जी काही दरी निर्माण झाली. दरी मिटवण्यासाठी कोण तरी हवं.’

पुढे बोलताना गोगावले म्हणाले की, ‘आम्ही लोकांच्या अडचणीसाठी वेळ मागयचो. मात्र मधली लोक दादा देत नव्हती. त्यामुळे हे झालं, असा खळबळजनक आरोप गोगावले यांनी केला. गोगावले यांची प्रतिक्रिया समोर येताच पेडणेकर आपली प्रतिक्रिया देण्यासाठी फोनवर आल्या.

यावेळी बोलताना पेडणेकरांनी विचारले की, ‘हे रामायण महाभारत कोणी केलं?,’ या प्रश्नावर गोगावलेंनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. पेडणेकरांचा आवाज ऐकताच गोगावले यांनी थेट फोन कट केला. ‘संवाद नव्हता तर कॅबिनेटमध्ये काय होत होतं,’ असा सवाल पेडणेकरांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.

दरम्यान, ‘शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करून भाजपबरोबर जायचंच ठरवलं आहे. पक्षप्रमुखावर अविश्वास दाखवायचाच आहे. मग कोण आहे यामागे? असा संतप्त सवाल पेडणेकरांनी उपस्थित केला. आम्ही संवाद एकनाथ शिंदे साहेबांशी करतोय, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

याचबरोबर ‘आम्ही समजूत काढायचा प्रयत्न केला आहे. ज्या गुजरातने तिरस्कार दाखवला. त्या गुजरातमध्ये का गेले? दोन हजार किलोमीटर लांब गुवाहाटीला जाऊन राहायची वेळ का आली? म्हणून साहेब हे बाळा बंड नको, बोलत आहेत, असे सवाल उपस्थित करत किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-
बंडखोर आमदारांची सुरक्षा काढल्यानंतर एकनाथ शिंदे ठाकरे सरकारवर भडकले; म्हणाले…
बंडाच्या पाचव्या दिवशी एकनाथ शिंदे आपल्या ‘त्या’ विधानावरून पलटले; सारवासारव करत म्हणाले..
एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुखपदी बसू शकतात का? वाचा काय आहेत शिवसेनेचे नियम
एकेकाळी चालवायचे रिक्षा, डोळ्यादेखत मुलांचा बुडून मृत्यु, असा आहे एकनाथ शिंदेंचा जीवनप्रवास

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now