स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या लोकप्रिय मालिकेतून अभिनेते किरण माने यांना तडकाफडकी काढण्यात आल्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर राजकीय भूमिका मांडल्याबद्दल आपल्याला काढण्यात आल्याचा आरोप माने यांनी केला आहे. तर, गैरवर्तनामुळं मानेंवर कारवाई करण्यात आल्याचं निर्मात्यांकडून सांगण्यात आलं आहे. (shivsena leader deepali bhosale sayed says kiran mane should join politics)
याचाच धागा पकडत शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद (deepali bhosale sayed )यांनी अभिनेते किरण माने यांनी राजकारणात प्रवेश करावा असं म्हटलं आहे. “मत मांडण्यासाठी त्यांना कामावरून काढून टाकणे आणि त्यांच्याबद्दल अफवा पसरवणे पूर्णपणे चुकीचे आहे. किरण माने हे उत्तम वक्ता आहेत. त्यांना मुद्दे मांडण्याची कला येत, त्यामुळे त्यांनी राजकारणात यावे असे मला वाटते,” असंही त्यांनी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “या वादाच्या आधी किरण माने कोण आहेत, कोणत्या मालिकेत काम करतात, हेही मला माहीत नव्हते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले, हे ही मला माहीत नव्हते. त्यावेळी मी पाठिंबा दिला होता पण नंतर अशा गोष्टी सुरू झाल्या की ज्यामध्ये त्यांनी, मालिकेच्या मंचावर चांगले काम न करणे, महिलांशी त्याची वागणूक चांगली नव्हती यासारख्या आरोपांचा समावेश होता.’
‘कोणतीही व्यक्ती कोणतेही विधान जारी करू शकतो, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत आपलं मत मांडायचा प्रत्येकाला अधिकार आहे,” असं दीपाली भोसले सय्यद म्हणाल्या. याच संदर्भात रोकठोक मत व्यक्त करताना दीपाली भोसले सय्यद यांनी मानेंना राजकारणात प्रवेश करण्याचा सल्ला दिलाय.
जेष्ठ अभिनेतेनाना पाटेकर यांनी किरण माने या प्रकरणावर भाष्य केले. ‘आजूबाजूलाकाय चुकीचं किंवा बरोबर चाललंय याच्याशी मला काही देणंघेणं नाही. मी माझं काम करतराहतो. माझी राजकीय भूमिका कशासाठी असावी?समाजाप्रती भूमिका काय आहे तेमहत्त्वाचं असल्याचे रोखठोक मत नाना पाटेकर यांनी मांडले आहे.
याबाबत ते पुण्यात पत्रकरांशीबोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आपण आपल काम करत राहायचं आणि एक दिवसकापरासारखं विरून जायचं. हा कसा वाईट?तो कसा वाईट? हेसगळं बघत बसायला मला वेळ नाही. परतीच्या वाटेवर असताना तुम्हाला काही गोष्टी सुचतअसतील तर इमानानं करा, एवढंच मला कळतं;असं नाना पाटेकर यावेळी बोलताना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
VIDEO: विराट कोहलीकडून राष्ट्रगीताचा अपमान, चाहत्यांनी केली कारवाई करण्याची मागणी
चिंतेत आणखी भर! एका व्यक्तीला कितीवेळा होऊ शकते ओमायक्रॉनची लागण?; उत्तर ऐकून बसेल तुम्हाला धक्का
‘पुष्पा’च्या यशानंतर शरद केळकरने व्यक्त केली भिती; म्हणाला, आपण आपलं मुळ विसरतोय त्यामुळं..
मोदी-शहांनीही निवडणुकीत माझ्या चेहऱ्याचा वापर केला; उद्धव ठाकरेंचा घणाघात