Share

शिवसेनेच्या वाघिनीने बांगरांना दिलं खुलं आव्हान; ‘एकदा नव्हे तर लाखवेळा गद्दार म्हणेन, हिंमत असेल तर…

सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता सत्ताधारी आणि विरोधकांमद्धे आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे एक – दोन नव्हे तर तब्बल शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल 40 आमदार सामील झाले आहेत. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

गद्दारी करून एकनाथ गटाला समर्थन दिले, म्हणून संतोष बांगर यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. तर आता बांगर यांनी गद्दार, बंडखोर म्हणून हिणवणाऱ्यांचं कानशील लाल करा, असा इशारा दिला. तुमच्या आसपास असणाऱ्या चांडाळ चौकडीला दूर करून आम्हाला मान सन्मानाने बोलवा, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

‘उद्धव ठाकरे आमच्या मनात आहे. आम्ही शिवसेनेतच आहोत. पण तुमच्या आसपास असणाऱ्या चांडाळ चौकडीला दूर सारा आणि मान सन्मानाने आम्हाला बोलवा. आम्ही विधानसभेवर भगवा असाच फडकवत ठेवू,’ असे वक्तव्य शिंदे गटात सामील झालेले आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.

बांगर यांचे आव्हान शिवसेना सोशल मिडियाच्या समन्वयक अयोध्या पौळ यांनीच स्विकारले आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटणार असल्याच बोललं जातं आहे. अयोध्या पौळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटलं आहे की, ‘एक वेळा नाही तर लाखवेळेस आपण त्यांना गद्दारच म्हणणार.

बांगर यांच आव्हान स्वीकारताना अयोध्या पौळ म्हंटलं आहे की, ‘एक वेळा नाही लाख वेळा आपण असेच म्हणणार. जीव गेला तरी चालेल पण आपल्या भूमिकेपासून माघार घेणार नसल्याचे पौळ यांनी स्पष्टच सांगितले आहे. शिवाय घडलेला प्रकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या कानावर देखील घातल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आता बांगर काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याचबरोबर बांगर यांनी दिलेल्या आव्हानावर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतील नेते काय प्रतिक्रिया देणार? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी काळात शिवसेनेतील अंतर्गत वाद मिटणार का? शिंदे गट पुन्हा सेनेत सामील होणार का? असे अनेक प्रश्न सर्वांचा पडले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे -एकनाथ शिंदे भेटणार; शिवसेना नेत्याच्या टि्वटमुळे खळबळ
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय घटनाबाह्य? वाचा तज्ज्ञांनी काय म्हंटलंय?
…तर आम्ही पुन्हा शिवसेनेत यायला तयार; शिवसेनेच्या बंडखोर माजी मंत्र्यांचा दावा

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now