शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे हे पुन्हा पक्ष बांधणीसाठी जोमाने कामाला लागले आहेत. सध्या शिवसेनेच्या गोटात बैठकांचे सत्र सुरू आहे.
आदित्य ठाकरे हे चांगलेच सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरेंनी मेळावे घेण्यावर जोर लावला आहे. नुकताच आदित्य ठाकरे यांचा शिर्डीत मेळावा पार पडला.
काही दिवसांपूर्वीच शिर्डीचे शिवसेना खा. सदाशिव लोखंडे यांनी शिंदेंना समर्थन दिलं आहे. यावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आक्रमक शिवसैनिकांनी शिवसंवाद मेळाव्याप्रसंगी लोखंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
तर दुसरीकडे मेळाव्यादरम्यान आदित्य ठाकरे यांचे भाषण सुरू असतानाच शिवसेचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांची मेळाव्या स्थळी एंट्री झाली. विशेष बाब म्हणजे, शिवसैनिकांनी ‘भावी खासदार’ असा उल्लेख केला.
दरम्यान, ठाकरे यांनी भाषण थांबवत ‘या घोलप साहेब’ असे म्हणाले. घोलप स्टेजवर दाखल होताच आदित्य ठाकरे यांनी त्यांचा हात हातात घेतला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी, भावी खासदार, भावी खासदार, शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणा दिल्या.
वाचा मेळाव्यानंतर बबनराव घोलप म्हणाले..!
‘मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक असून ५४ वर्ष शिवसेनेत आहे. पक्षाचा आदेश पाळणे माझा धर्म असल्याच देखील घोलप यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.