बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपशी हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं आहे. मात्र शिंदे यांच्या विरोधात असलेले शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आहेत. शिंदे गटाने भाजपच्या मदतीने राज्यात शिंदे सरकार स्थापन केले आहे. यामुळे अख्ख महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येऊन कोसळलं आहे.
राज्यात ‘शिंदे-फडणवीस’ सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेच्या गोटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारच्या विरोधात मतदान करणारे हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार आमदार संतोष बांगर हेही शिंदे गटात सामील झाले आहेत.
तर दुसरीकडे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना राष्ट्रपतीपदासाठी भाजप युतीच्या उमेदवार द्रौपती मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती पत्राद्वारे केली होती. यावर घडामोडींमुळे सध्या शिवसेनेच्या गोटात अस्थिरतेच वातावरण निर्माण झालं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे मुंबईत आता शिवसेनेला संघटनात्मक पातळीवरही गळती लागल्याच पाहायला मिळत आहे. मागाठाणेतील दोन शाखाप्रमुख आणि तीन महिला शाखा संघटकांचे पदाचे राजीनामा दिले आहेत. तर आता शिनसेनेसाठी आणखी एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे.
तर आता शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा देत शिवसेनेला आणखी धक्का दिला आहे. अडसूळ हे अमरावतीचे माजी खासदार आहेत. तर अडसूळ यांच्या मुलाने यापूर्वीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.
यामुळे आता अडसूळ देखील शिंदे गटात जाणार का? अशा उलटसुलट चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. ठाकरे सरकार कोसळताच आनंदराव अडसूळ यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. मात्र अद्याप राजीनामा देण्याचे कारण समोर आलेलं नाहीये.