Share

जिच्यावर विश्वास टाकला तिनेच धोका दिला! ठाकरेंची आक्रमक वाघिन शिंदे गटात सामील

Shivsena: गेल्या काही दिवसांपासून राजकारण मोठी उलथापालथ होत आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट तयार झाले. परंतु, यादरम्यान शिवसेनेला गळती लागली आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. सध्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे.

दिपाली सय्यद वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. त्यांच्या या भेटींवरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तर त्याचवेळी दीपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्यासह रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावरही खोचक शब्दात टीका केली आहे.

आज दिपाली सय्यद यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर दिपाली सय्यद या ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, येत्या शनिवारी मी शिंदे गटात सहभागी होणार आहे. येत्या तीन दिवसांत माझा पक्षा प्रवेश होईल. त्यामुळे कधी आणि किती वाजता प्रवेश करायचा. कुठे प्रवेश होईल, याची चर्चा करण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले.

तसेच, मला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत आणलं होतं. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्या पाठी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. त्याच कर्तव्य भावनेतून मी शिंदे गटात येत आहे, असंही दिपाली सय्यद म्हणाल्या. तर बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी रिपब्लिकन चळवळीतील महत्त्वाच्या नेत्या सुषमा अंधारेंना पक्षात आणलं होतं. तेव्हापासून दीपाली सय्यद या नाराज असल्याचं बोललं जात होतं.

दरम्यान, मुंबई महापालिकेतून मातोश्रीवर पोहोचणारे खोके कमी झाले म्हणून रश्मी वहिनी नाराज आहेत. सुषमा अंधारे आणि निलम गोऱ्हे या तर चिल्लर आहेत. खऱ्या सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत, असा थेट आरोप दिपाली सय्यद यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

Sharad Pawar : “शरद पवारांनी उध्दव ठाकरेची लाज राखण्यासाठी बिनविरोध निवडणूक व्हावी असा आग्रह धरला आहे”

shivsena : “शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार…”, आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now