Share

सहनशक्तीचा बांध फुटला! ‘या’ १२ आमदारांची आमदारकी रद्द करा, शिवसेनेची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी

एकनाथ शिंदेंसोबत ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे त्यातील १२ आमदारांच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. शिवसेनेने या आमदारांच्या विरोधात उपाध्यक्षांकडे मागणी केली आहे की, त्यांची आमदारकी रद्द करा. शिवसेना नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतीत कायदेशीर पिटीशन दाखल केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

आमदार पक्षाच्या विधीमंडळात गैरहजर होते आणि त्यांच्यामुळं व्हिप काढलेला असतानाही ते आमदार उपस्थित न राहिल्याने त्यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. जरी शिवसेनेने पिटीशन दाखल केले असले तरी ही प्रक्रिया सोपी नाही. या प्रक्रियेदरम्यान प्रत्येक आमदाराला स्वताची बाजू मांडण्याची संधी दिली जाते.

या प्रकरणात आमदाराच्या वागणुकीकडे लक्ष दिले जाते. सर्व पुरावे पाहिल्यानंतरच अध्यक्ष यावर कारवाई करतील अशी माहिती तज्ञांनी दिली आहे. ज्या १२ आमदारांविरोधात पिटीशन दाखल करण्यात आली आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे, संजय शिरसाठ, बालाजी किणीकर, तानाजी सावंत, संदिपाम भुमरे, भारत गोगावले, लता सोनावणे, अनिल बाबर, महेश शिंदे, प्रकाश सुर्वे, अब्दुल सत्तार, यामिनी जाधव या आमदारांची नावे आहेत.

पिटीशन दाखल केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनीही एकामागून एक ट्विट करत आक्रमक पावित्रा घेतला आहे. ते म्हणाले आहेत की, कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो!

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत.

कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे, असं ट्विट त्यांनी केलं आहे. दिवसेंदिवस राजकारण तापत चाललं आहे. आता यावर उद्धव ठाकरे सरकार काय निर्णय घेतंय? आणि या बंडखोर आमदारांची आमदारकी खरंच रद्द होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

https://twitter.com/mieknathshinde/status/1540015035875205121?s=20&t=9Cs6nzTMcrz7nlcLvwobjQ

महत्वाच्या बातम्या
पूजा चव्हाण प्रकरणातील संजय राठोड शिंदे गटात सामील; आता चित्रा वाघ काय भूमिका घेणार?
‘मुख्यमंत्री साहेब..! आमची भूमिका तुम्हाला पटत नसेल पण तुम्ही मनातून आमच्या सोबत असाल’
…तोपर्यंत राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकारमध्ये राहणार; शरद पवारांनी एका शब्दातच केलं स्पष्ट
आमदार बांगर शिवसेनेतच; बाळासाहेबांचा कट्टर, निष्ठावान शिवसैनिक म्हणून होणार सत्कार

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now