राज्यातील सत्तेत जरी महाविकास आघाडी सरकार असले तरी स्थानिक राजकारणात काही ठिकाणी या तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातले मतभेद कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या याची चांगलीच चर्चा सुरु आहे. (shivsena absence at ncp event)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयाचा भूमिपूजन समारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित होते. असे असतानाही तीन शिवसेना आमदारांनी यावर बहिष्कार टाकला आहे. मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या या कार्यक्रमावर शिवसेनेच्याच आमदारांनी बहिष्कार टाकला आहे.
या बहिष्कारामुळे सध्या शिवसेना आमदार चांगलेच चर्चेत आले आहे. तसेच या गोष्टींमुळे शिवसेना आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना किती वैतागले आहे हे यातून दिसून येत आहे. या गोष्टीमुळे पालकमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावरील आमदारांची नाराजी पुन्हा दिसून आली आहे.
उसर येथे ५२ एकर जागेत जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने ४०६ कोटी निधीही मंजूर केला आहे. आज या महाविद्यालयाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित होते, तर शरद पवार यांच्या हस्ते या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आमदार बाळाराम पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. पण शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकारी कोणीच उपस्थित नव्हते. शिवसेना आमदार महेश दळवी, भरत गोगवले आणि महेंद्र थोरवे हे जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन आमदार कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.
काही दिवसांपासून शिवसेनेने पालकमंत्री हटाव अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरु आहे. आजच्या भूमिकेतून पुन्हा एकदा हा वाद दिसून आला आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रम पत्रिकेत शिवसेना आमदारांची नावे टाकण्यात आली असून त्यांना निमंत्रणही देण्यात आले होते, तरीही ते या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.
महत्वाच्या बातम्या-
शेतकऱ्यांना किडे-मुंग्या समजू नका, त्यांचे प्रश्न गांभीर्याने घ्या, नाहीतर..; राजू शेट्टी संतापले
नोकरी सोडूून सुरू हा सुपरहिट बिझनेस, आरामात होईल महिन्याला ५ ते १० लाख रुपयांची कमाई
२१ वर्षीय मामीने केले १६ वर्षीय भाच्याचे लैंगिक शोषण; नागपूरातील धक्कादायक घटनेने उडाली खळबळ