शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिंदे गटासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे.
शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी तर आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन पानी पत्र लिहून खळबळजनक आरोप केले आहेत. तर आता एका सामान्य शिवसैनिकाने शिरसाठ यांना पत्र लिहिले असून खळबळजनक आरोप केले आहेत.
वाचा एका सामान्य शिवसैनिकाने शिरसाठ यांना लिहिलेलं पत्र…
‘शिरसाठ हे सर्वसाधारण रिक्षावालापासून तीन वेळेस आमदार झाले. एवढच नाही तर शिरसाटजी आपण आपल्या मुलालाही आमची इच्छा नसताना आमच्यावर लादले. आम्ही शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांच्या प्रेमाखातर त्याची लायकी नसताना आम्ही निवडणूक दिले, असं सामान्य शिवसैनिकाने आपल्या पत्रात म्हंटलं आहे.
पुढे शिवसैनिकाने म्हंटलं आहे की, शिरसाटजी तुम्ही उद्धव ठाकरे भेटत नाही म्हणता. काल मुख्यमंत्र्यांनी, ते का भेटत नव्हते यामागचे कारण सांगितले. मात्र तुम्ही मतदारांना न भेटता अनेक रात्री मुंबईला कुठे घालवता याची कल्पना सर्वांना असल्याच शिवसैनिकाने आपल्या पत्रात म्हंटलं आहे.
दरम्यान, ‘शिरसाटजी तुमचे अनेक कारनामे शिवसैनिकांनी पाठीशी घातले हे फक्त शिवसेनेच्या आपुलकी पोटी, असे पत्रात म्हंटलं आहे. ‘संजय शिरसाट म्हणजे आमच्यासाठी फक्त शिवसेनेने दाखवलेला दगड असल्याच शिवसैनिकाने आपल्या पत्रात स्पष्टच म्हंटलं आहे.
दुसरीकडे शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटलं आहे, ‘काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती.’
महत्त्वाच्या बातम्या
“पवारसाहेब जोपर्यंत आखाड्यात आहेत, तोपर्यंत भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही”
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद का नाही दिलं? उद्धव ठाकरेंनी सांगितला पवारांसोबतचा ‘तो’ किस्सा
मी कधी बंड करेल का? डोळ्यांत पाणी आणून शिंदे बोलले अन् भावूक झालेले ठाकरे जाळ्यात अडकले; वाचा इनसाईड स्टोरी
माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर…; उद्धव ठाकरेंचे आमदारांना भावनिक आवाहन