महाराष्ट्र केसरीची गदा एकदा तरी जिंकावी, असं स्वप्न प्रत्येक पैलवानाचं असतं. मात्र ते प्रत्येकाला झेपणारं नसतं. हेच स्वप्न पूर्ण करता कुस्तीच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षे (Shivraj Rakshes) विजेता ठरला आहे. सध्या शिवराजचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिवराज राक्षेने मानाची केसरी गदा पटकावली आहे. पैलवान शिवराजने महेंद्र गायकवाड यांचा पराभव करत महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे. गादी विभागातील सेमी फायनलमध्ये शिवराज राक्षेने हर्षवर्धन सदगीरला ८-२ अशा एकतर्फी फरकाने अंतिम सामन्यात धडक मारली.
महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे आणि उपविजेत्या महेंद्र गायकवाड हे दोघंही मालामाल होताना दिसत आहेत. महाराष्ट्र केसरी विजेत्यांना गाड्या बक्षीस देण्यात आले आहे. त्यामुळे त्या बक्षीसांची चर्चा सर्वत्र सुरू आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा १४ जानेवारी रोजी पारपडली.
यंदा महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा पुण्यात पारपडली. यात तब्बल ९०० हुन अधिक पैलवानांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये शिवराजने धटक मारली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकाला चांदीची मनाची गदा, महिंद्रा थार आणि पाच लाखांचे रोख बक्षीस देण्यात आले आहे.
यादरम्यान, उपविजेत्या महेंद्र गायकवाडला ट्रक्टर आणि रोख अडीच लाख रुपये देण्यात आले आहे. तसेच माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या बक्षिसांचं वाटप करण्यात आले आहे. दोघांना दिलेल्या या बक्षीसाची सध्या चर्चेचा सुरू आहे. शिवराज राक्षे ५५ वा महाराष्ट्र केसरी पैलवान ठरला आहे.
दरम्यान, मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील थरार नुकताच पार पडला. यामध्ये महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात अंतिम लढत झाली. शिवराज राक्षे हा यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. परंतु, सध्या सोशल मीडियावर शिवराज पेक्षा जास्त चर्चा सिकंदर शेख याची होत आहे.
महत्वाच्या बातम्या






