Share

इथेच शिकेन पण परदेशात जाणार नाही; युक्रेनमधून परत आलेल्या विद्यार्थ्याने सांगितली तिथली भयानक परिस्थिती

गेल्या आठवडाभरापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात रशिया खुपच आक्रमक झालेला दिसत आहे. तसेच या युद्धामुळे युक्रेनमधील अनेक नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे अनेकजण स्वत:ला वाचवण्यासाठी धडपड करत आहे. भारतातील हजारो विद्यार्थी तिथे शिकत आहे, त्यांनाही भारतातले आणले जात आहे. (shivpal on ukraine condition)

तसेच मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी गेलेली हजारो भारतातील मुले अडकली असून ते आपल्या देशात परतण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक विद्यार्थी परत आले आहे, त्यातलाच एक विद्यार्थी म्हणजे शिवपाल. शिवपाल हा राजस्थानमधील धौलपूरचा रहिवासी असून तो एमबीबीएस शिकण्यासाठी युक्रेनला गेला होता.

आता युक्रेनमधून परत आल्यानंतर शिवपालने तिथला भयानक अनुभव सांगितला आहे. तिथले वातावरण खुप भयानक आहे, त्यामुळे आपले पुढील वैद्यकीय शिक्षण इथेच झाले तर तो पुन्हा युक्रेनला जाणार नाही, अशी इच्छा या विद्यार्थ्याने व्यक्त केली.

शिवपाल घरी परतल्यानंतर त्यांच्या घरात उत्सवाचे वातावरण आहे. शिवपालने सांगितले की, युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून तेथे सतत बॉम्बफेक होत आहे. अशा परिस्थितीत तेथून सीमेवर पोहोचणे खूप त्रासदायक आहे. शिवपाल यांनी सांगितले की, ३० किमी चालल्यानंतर तो सीमेवर पोहोचला.

काही विद्यार्थी मायदेशी परतले असून अनेक विद्यार्थी सीमेवर उपस्थित आहे. ते भारतीय विमानांची वाट पाहत आहेत. युक्रेनमधील विद्यार्थ्यांना युद्धाच्या काळात स्थानिक सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही, असे शिवपालने सांगितले आहे.

मला सुरक्षित मायदेशी आणल्याबद्दल मी भारत सरकार आणि राजस्थान सरकारचे आभार मानतो. आम्हाला भारत सरकारने खूप मदत केली आणि सीमेवरून मुंबईत आणले. राजस्थान सरकारच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत केली आणि माझ्या घरापर्यंतच्या प्रवासाची संपूर्ण जबाबदारी घेतली, असे विद्यार्थी शिवपालने सांगितले आहे.

खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्याचे विद्यार्थी शिवपालने सांगितले आहे. आम्हाला युक्रेनमध्ये अनेक दिवस त्रास सहन करावा लागला. कारण तेथील सरकारने जबाबदारी घेण्यास नकार दिला होता. दोन रात्र सीमेवर मुक्काम केला आणि तिसऱ्या दिवशी सीमा ओलांडली, असे शिवपालने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-
1957 ते 1971: सुरक्षा परिषदेत रशियाने भारतासाठी ६ वेळा वापरली विटो पावर, अमेरिकेने दरवेळी केला विरोध
युक्रेनमध्ये सरेंडर केल्यानंतर ढसाढसा रडला रशियन सैनिक, लोकांनी चहा पाजला आणि आईला फोन लावून दिला
चेन्नई सुपर किंग्सचे १४ कोटी गेले पाण्यात, ‘हा’ स्टार खेळाडू नाही खेळू शकणार आयपीएल? धोनीला झटका

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now