Share

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसमोर ठेवली ‘ही’ मोठी अट; म्हणाले, चर्चा करणार पण त्यासाठी…

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. तसेच त्यांची नाराजी गेल्या काही दिवसांत स्पष्टपणे दिसून सुद्धा आली होती. त्यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनी सुद्धा भाषण देण्यास नकार दिला होता, त्यामुळे ते शिवसेनेवर नाराज असल्याचे स्पष्ट झाले होते. (shivena leader eknath shinde conditon)

अशात एकनाथ शिंदेबाबात मोठी माहिती समोर आली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे सोमवारपासून ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्यांच्यासोबत १३ आमदार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे हा शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का असू शकतो. एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल असल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचा एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला असल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्यांनी वरिष्ठ नेत्याला चर्चेसाठी होकारही दिला असून त्या वरिष्ठ नेत्याला एकनाथ शिंदे यांनी सुरतला बोलावले असल्याचे म्हटले जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी एका वरिष्ठ नेत्याला सुरतला बोलवल्यामुळे तो नेता शिंदेंची नाराजी दूर करेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही एक सुचक विधान केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला असल्याचे त्यांनी म्हटले होते.

तसेच शिवसेनेचा कोणता नेता एकनाथ शिंदेंकडे चर्चेला जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातच्या सुरतमध्ये असून त्यांच्यासोबत १३ आमदारही आहेत. त्यामुळे शिवसेनेसमोर एकनाथ शिंदे यांना मनवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपद देणार? राजकीय चर्चाना उधाण
कधीही कोसळू शकतं महाविकास आघाडी सरकार, क्रॉस व्होटिंग झाल्यानंतर वाचा नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदेंच्या नाराजीची कारणे आली समोर; शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यानेच केला खुलासा

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now