सासरच्या त्रासाला कंटाळून आली माहेरी, UPSC पास करत देशात पटकावला १७७ वा क्रमांक

असे म्हणतात परिस्थिती कशीही असो इच्छा शक्ती असेल, तर माणूस त्याच्यातून नक्कीच मार्ग काढतो. त्यातलीच एक आहे शिवांगी गोयल. शिवांगी गोयल यांनी नुकतीच युपीएससीची परीक्षा पास केली आहे. इतकेच नाही, तर त्यांनी देशात १७७ वी रँक मिळवली आहे. (shivangi goyal success story)

उत्तर प्रदेशच्या पिलखुवा, हापूर येथील रहिवासी असलेल्या शिवांगी गोयल यांनी युपीएससी पास करुन कुटुंबाचेच नाही, तर संपूर्ण जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. पण आतापर्यंतचा त्यांचा प्रवास खुप कठीण होता. शिवांगी यांनी सांगितले की त्या विवाहित आहे आणि त्यांना एक मुलगी देखील आहे.

सासरच्या छळाला कंटाळून त्या आपल्या माहेरच्या घरी राहू लागल्या. त्यांचा पतीसोबत घटस्फोटाचा खटलाही सुरू आहे. त्यांनी सांगितले की, त्यांना लग्नापूर्वीच आयएएस व्हायचे होते. त्यांनी दोनदा परीक्षाही दिली पण दोन्ही वेळा त्यांना यश मिळवता आले नाही.

त्यानंतर शिवांगी यांचे लग्न झाले. तिथे त्यांच्यावर घरगुती हिंसाचार होत होता. त्यामुळे त्या ७ वर्षांच्या मुलीसह माहेरी आल्या. तेव्हा आईवडिलांनी त्यांना पुर्ण पाठिंबा दिला. तसेच तुला जे हवे ते कर. त्यानंतर शिवांगीने पुन्हा युपीएससीची तयारी करण्याचे ठरवले आणि त्या अभ्यास करु लागल्या.

शिवांगी यांनी सांगितले की, त्या हा तिसरा प्रयत्न होता. लहानपणापासून त्यांची इच्छा होती की आपण युपीएससी पास करुन एक अधिकारी बनावे. कठोर परिश्रम आणि समर्पणानंतर अखेर तो दिवस आला. आपल्या यशाचे श्रेय त्या आई-वडील आणि मुलीला देतात.

शिवांगी गोयल या हापूरच्या पिलखुवा शहरातील बस स्टॉपजवळ राहतात. त्यांचे वडील राजेश गोयल हे व्यापारी आहेत आणि आई गृहिणी आहे. शिवांगी यांनी सांगितले की, त्या शाळेत असताना त्यांच्या मुख्याध्यापकांनी यूपीएससीची तयारी करण्यास सांगितले होते. तेव्हापासून आयएएस होण्याचे त्यांचे स्वप्न होते.

त्या पुढे म्हणाल्या, मला समाजातील त्या विवाहित महिलांना एक संदेश द्यायचा आहे की, त्यांच्या सासरच्या घरात त्यांच्यासोबत काही चुकीचे घडले तर त्यांनी घाबरू नका, आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून दाखवा. महिला त्यांना पाहिजे ते करू शकतात.

महत्वाच्या बातम्या-
जॉनी डेपने जिंकला मानहानीचा खटला, अंबर हर्डला द्यावी लागणार ‘इतक्या’ कोटींची नुकसान भरपाई
सरसेनापती हंबीरराव रिलीज झाल्यानंतर राज ठाकरे तब्बल दोन तास.., प्रविण तरडेंनी सांगितला किस्सा
मुंग्यांनी केलेल्या ‘त्या’ गोष्टीमुळेच देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली, खाणीत आहे २२ कोटी टन सोने