Share

भाजपला मोठा झटका, माजी राज्यमंत्री हाती बांधणार घड्याळ, २ एप्रिलला करणार पक्षप्रवेश

सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. त्यांनी घेतलेल्या या निर्णायामुळे भाजपला खूप मोठा धक्का बसला आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी राष्ट्रवादीचेच घड्याळ हाती बांधणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाईक राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा सर्वत्र रंगली होती.

या चर्चेवर आता शिका मुहुर्त बसला आहे. येत्या २ एप्रिल रोजी शिवाजी नाईक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. आज मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीराव नाईक यांची बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये शरद पवार यांनी शिवाजीराव नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आपण सगळे पूर्वीं एकाच विचाराने काम केले आहे. आता पुन्हा एकत्र येऊन अधिक जोमाने काम करूया. आज शिवाजीरावांनी वाढदिवशीच राष्ट्रवादी पक्षात येण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. असे शरद पवार नाईक यांना म्हणाले.

शिवाजीराव नाईक हे गेली दोन वर्षे भाजपवर नाराज असल्याचे समोर आले होते. भाजपने २०१४ पासून त्यांना मंत्रिपदासाठी डावलले होते. त्याचबरोबर नाईक यांच्या अडचणीत आलेल्या संस्थांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. त्यामुळे नाईक यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे राष्ट्रवादीने स्वागत केले आहे.

शिवाजीराव नाईक भाजपचे शिराळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री आहेत. 2014 मध्ये नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाईक यांना आश्वासन दिले होते की, आम्ही तुम्हाला मंत्रिपद देऊ. परंतु हे आश्वासन प्रत्यक्षात उतरलेच नाही.

आता येत्या २ एप्रिल रोजी शिवाजीराव नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थित प्रवेश करणार आहेत. २ एप्रिलला शिराळ्यात भव्य शेतकरी मेळावा घेऊन त्यांना प्रवेश कार्यक्रम पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या
VIDEO: बीडच्या शिक्षिकेचा जगभरात बोलबाला, शिकवण्याची पद्धत पाहून परदेशी विद्यार्थीही हैराण
तेव्हा ममता बॅनर्जींनी मला फोन केला आणि म्हणाल्या…; शरद पवारांनी सांगितला नवाब मलिकांच्या अटकेनंतरचा ‘तो’ किस्सा
‘ही’ नंबर प्लेट असेल तर कोणत्याच राज्यातील पोलिस तुम्हाला अडवणार नाहीत, वाचा केंद्राच्या नवीन प्रोजेक्टबद्दल..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now