Share

भाजपला मोठे खिंडार! माजी मंत्र्यासह ४८ हजार कार्यकर्ते पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून भाजपचे अनेक नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जाताना दिसून येत आहे. अशात भाजपला आता आणखी एक मोठे खिंडार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार आहे. (shivajirao naik and 48 thousasnd workers in ncp)

माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह ४८ हजार समर्थक व कार्यकर्त्यांनी भाजपच्या पद आणि पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहे. त्यानंतर आता शिवाजीराव नाईक आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ एप्रिलला प्रवेश घेणार आहे, अशी माहिती शिराळा तालुका भाजपचे अध्यक्ष सुखदेव पाटील यांनी दिली आहे.

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, असे सुखदेव पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, १४ सेल आणि १३ आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

त्यामध्ये ३३४ बूथ केंद्र, ८४ शक्ती बूथ केंद्राच्या सर्व पदाधिकारी व शिराळा तालुक्यातील २७ सरपंच २१९ ग्रामपंचायत सदस्य वाळवा तालुक्यातील १७ सरपंच व १३७ ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी भाजपच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.

दरम्यान, शिवाजीराव नाईक यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी पक्षातील काही लोकांना रोखले असते तर माझा पराभव झाला नसता, असा आरोप शिवाजीराव नाईक यांनी केला होता.

भाजप प्रदेशाध्यक्षांचे धोरण एकाला जवळ करायचे आणि दुसऱ्याला त्रास देणाऱ्या खेळ्या खेळत राहायच्या. कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा वेगळा हेतू आहे, मात्र त्याचा परिणाम आम्हाला इथे सहन करावा लागला. वेगळ्या खेळ्या करून त्यांनी भाजप कार्यकर्त्यावर अन्याय केला, असेही शिवाजीराव नाईक यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
पेट्रोल, डिझेल नाही, तर हायड्रोजन कार घेऊन गडकरी थेट पोहचले संसदेत; म्हणाले, आत्मनिर्भर भारतासाठी…
सोबत जगण्यामरण्याची वचने देणाऱ्या प्रेयसीने शेवटच्या क्षणी केला गेम; विष पिलेल्या प्रियकराला जागीच सोडून गेली पळून
भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान, म्हणाला, हलाल मांस म्हणजे आर्थिक जिहाद; हिंदूंना केले ‘हे’ आवाहन

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now