Share

“उद्धव ठाकरेंना हिंदुजननायक म्हटलं तर कोणाच्या पोटात दुखायचं काय कारण?”

राज्यात सध्या मनसे विरुद्ध शिवसेना असा वाद पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते राज ठाकरेंवर टीका करताना दिसून येत आहे. तर मनसे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना दिसून येत आहे. तसेच मनसेने शिवसेनेच्या हिंदुत्वावरही प्रश्न उपस्थित केला आहे. (shivajirao adhalrao patil criticize raj thackeray)

असे असताना शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मनसेवर निशाणा साधला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एक ट्विट केले होते. तिथे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हिंदुजननायक असे म्हटले होते. त्यानंतर मनसे आक्रमक झाल्याचे पाहून त्यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेचा जन्मच हिंदुत्व जागृत करणे आणि हिंदुत्व पेटवणे यामध्ये गेला आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून हिंदुत्वाची पाठराखण करणारा पक्ष हा शिवसेना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हिंदुजननायक म्हटले तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण नाही, असा टोला शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला आहे.

सध्या राज ठाकरे त्यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे चांगलेच चर्चेत आहे. तसेच राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना आता हिंदुजननायक असेही म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना आढळराव पाटील यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. ते आंबेगावात बोलत होते.

राज ठाकरे यांना हिंदुजननायकाची पदवी कोणी दिली? असा सवाल शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच ती पदवी काही कॉपीराईट नाही. त्याच्यावर कोणाची मोनोपोली नाही, असे म्हणत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज ठाकरेंना सुनावलं आहे.

दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांच्या सभेबद्दलची माहिती दिली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची १४ मे रोजी सभा होणार आहे. ही सभा मुंबईच्या ब्रांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी जे पोस्टर शेअर केले होते, त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक म्हणुन करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या-
आम्ही ब्रह्मदेवाचे ‘बाप’ आहोत बेट्याहो, आम्ही त्याला जन्म दिलाय; किरण मानेंच्या पोस्टने उडाली खळबळ
बाप हा बाप असतो, बाॅलीवूड तुमचा बाप आहे; दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूला सुनील शेट्टीने सुनावले
भडकाऊ भाषण देणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने झापले; असा आदेश काढला की कुणी हिंमतच करणार नाही

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now