Share

शिवसेनेच्या ‘या’ आदेशाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवली केराची टोपली; वाचा नेमकं काय घडलं

सध्या राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. उद्याचा दिवस देखील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असणार आहे. उद्या विधानसभा अध्यक्षपद निवडणूक होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.

भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पार्श्वभूमीवर शिवसेनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे राजन साळवी  यांना निवडुन आणण्यासाठी शिवसेनेने सर्व आमदारांना व्हिप बजावला आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावं, असा आदेश आमदारांना देण्यात आला आहे.

तर शिवसेनेच्या या निर्णयावर एकनाथ शिंदे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिलेली आहे. आमच्याकडे बहुमत असल्याने सुनील प्रभू यांनी जारी केलेला व्हीप आम्हाला लागू होत नाही, असं शिंदे यांनी म्हंटलं आहे. ते याबाबत मुंबई माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना शिंदे यांनी शिवसेनेने जारी केलेला व्हीपवर भाष्य केलं.

काही तासांपूर्वीच शिंदे गोव्याच्या विमानतळावर दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या व्हीपबद्दल विचारण्यात आलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमच्याकडे बहुमत आहे, दोन तृतियांश बहुमत आमच्याकडे असल्याने आम्हाला शिवसेनेचा व्हीप लागू होत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलताना शिंदे म्हणाले, “आम्ही बहुमत चाचणीला सामोरं जाणार आहोत. आमच्याकडे बहुमत असल्याने विजय आमचाच होईल,” असंही ते म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्र विधासभा अध्यक्षांचे पद दोन वर्षापासून रिक्त असल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now