भाजप(BJP): एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार व 12 खासदार यांनी बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. त्यांनतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. आता शिवसेना कोणाची? ठाकरेंची की शिंदेंची? हा वाद सुरु झाला. हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचला. याबाबत अनेक राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. यावेळी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा याबाबत प्रतिक्रिया दिली.
पुण्यात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, “शिवसेना शिवाजी महाजारांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे.” यामधून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टोला लगावला आहे.
उदयनराजे म्हणाले की, “शिवसेनेत बंड झाला याबाबत मला काही माहिती नाही. बंड झालाय का? शिवसेना कुणाची आहे यावरून वाद सुरू आहे. शिवसेना शिवाजी महाजारांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे. अरे वा, मग शिवसेना माझीच म्हटली पाहिजे. महाराष्ट्र माझाच म्हटला पाहिजे. काही नाही म्हणायचं.”
पुढे उदयनराजे म्हणाले की , “लोकशाहीत संपूर्ण महाराष्ट्र हा लोकांचा आहे. लोकांच्या माध्यमातून कुठल्याही पक्षातील आमच्यासारखे लोकप्रतिनिधी मग ते आमदार असो वा खासदार निवडून जातात. त्यामुळे हा छत्रपतींचा महाराष्ट्र लोकांचा महाराष्ट्र आहे,”
“इतर राजांमध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये इतकाच फरक होता की ते स्वतःला राजा म्हणायचे नाही. मात्र, जनतेचा राजा म्हणून ओळख केवळ शिवाजी महाराजांची आहे,” असंही उदयनराजे भोसलेंनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या
जिथं कन्हैयालालची हत्या झाली तिथेच ताजिया मोहर्रमला लागली आग, हिंदू कुटुंबाने केलं असं काही..
Uddhav thackeray : नितीश कुमार यांचे कौतुक करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर लावला आरोप, म्हणाले…
Shivsena: …तर त्यांनी शिवसेना फोडलीच नसती, राष्ट्रवादी काँग्रेसची शिंदे गटावर सडकून टीका
Pankaja Munde : ‘विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्यात माझाच हात’, पंकजा मुडेंच्या कबूलीने राजकारणात खळबळ