सध्याची परिस्थिती पाहता शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला; पवार टाकणार ‘असा’ डाव

सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. शिंदे यांच्या बंडामुळे अख्ख महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. ३० जून रोजी बहुमत चाचणीचे आदेश राज्यपालांनी दिल्यानंतर आता शिंदे गट मतदानासाठी मुंबईत येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

विरोधी पक्ष भाजपाने केलेली मागणी राज्यपालांनी मान्य करत राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणील सामोरे न जाताच राजीनाम द्यावा, असा विचार शिवसेनेमधून मांडण्यात येत आहे.

तर यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा यांनी महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राजीनामा न देता बहुमत चाचणीला सामोरे गेले पाहिजे, असा सल्ला यांनी दिला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेच्या एका गटाचे असं म्हणणे आहे की, जर उद्या अधिवेशन झाले तर भाजप आणि बंडखोर गटाकडून उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली जाण्याची शक्यता आहे. तसेच अधिवेशनातीला कामकाजाचे लाईव्ह प्रसारण असल्यामुळे शिवसेनेची बदनामी होईल.’

दरम्यान, शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी अर्थात सिल्व्हर ओकवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. मात्र. या बैठकीला शिवसेना नेते अनुपस्थित असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा बंडखोरीचा गट मजबूत होताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्ता वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. बैठकांचे सत्र सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या
बहुमत चाचणीला राष्ट्रवादीचे ‘हे’ चार आमदार गैरहजर राहणार? ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार
ठाकरे सरकार कोसळणार! महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार नव्या सरकारचा शपथविधी
त्यांनी वर्षा सोडली, आमदार सोडले पण शरद पवारांना सोडायला काही तयार नाहीत- गुलाबराव पाटील
शाहरुखलाही भेटलो होतो पण…, ६ वेळा रणजी चॅम्पियन कोचने सांगितले IPL जॉईन न करण्याचे कारण