Share

राज्यसभा निवडणुकीनंतर आघाडीत बिघाडी, शिवसेनेने घेतला मोठा निर्णय; राजकीय वर्तुळात खळबळ

udhav thackeray
राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागल्याच दिसून येत आहे. राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर आता यावरून राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीन तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यसभा निवडणूकीत पुन्हा एकदा फडणवीसांची खेळी यशस्वी ठरली आहे. महाविकास आघाडीची ९ मते फुटली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पहिल्या पसंतीची २७ मते ही धनंजय महाडिक यांना मिळाली आहे.

तर धनंजय महाडिक यांच्याविरोधात असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना ३३ मते मिळाली आहे. ‘राज्यसभा निवडणुकीत मोठी दगाबाजी झाली आहे. शब्द देऊन ही दगाबाजी करण्यात आली आहे. त्यांची यादी आमच्याकडे आहे,’ अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. याच मुद्यावरून आघाडीत बिघाडी झाल्याच पुन्हा एकदा निदर्शनास आलं आहे. अशातच शिवसेनेने एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी आपापलं बघावं अशी भूमिका शिवसेनेने घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीतील चित्र पाहता शिवसेना आता महाविकास आघाडीतील इतर पक्षांवर विश्वास ठेवायला तयार नाहीये अशी सध्या हाती येत आहे. यामुळे आगामी विधानपरिषद निवडणुकीत याचे काय परिमाण पडणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

याचबरोबर संजय राऊत यांनी केलेले आरोप अपक्ष आमदारांच्या जिव्हारी लागले आहेत. संजय राऊत यांनी केलेले आरोप देवेंद्र भुयार यांनी आरोप फेटाळले आहेत. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत निवडून आलो आहे. तेव्हापासून मी आघाडीसोबत आहे. संजय राऊत यांचा पक्ष आत्ता आघाडीसोबत आला. गद्दारी करायची असती तर यापूर्वीच केली असती पण मतदान करुनही असे बोलत असतील तर संजय राऊत यांचं कुठेतरी चुकत असल्याच भुयार यांनी म्हंटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now