राज्यात ठाकरे सरकारला सत्तेतून पायउतार व्हाव लागलं आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिंदेशाही पर्वास सुरुवात झाली आहे. शिंदे यांनी बंड केलं अन् राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं.
त्यानंतर विधान सभेत शिंदे सरकारची अग्निपरीक्षा देखील झाली. बहुमत चाचणीत शिंदे सरकार पास झालं. त्यानंतर शिवसेनेने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली.
या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांवर तात्काळ कारवाई न करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. तर दुसरीकडे शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ नये, यासाठी शिवसेनेने थेट राज्यपालांना पत्र पाठवले आहे.
वाचा पत्रातून शिवसेनेने काय म्हंटलं आहे..?
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने राज्यपालांना पाठविलेल्या पत्रातून म्हंटलं आहे की, कोर्टाच्या निर्णयानुसार यापुढे मंत्रिमंडळ विस्तार करु नये. सध्या अस्तित्वात असलेले सरकारही बेकायदेशीर आहे. यामुळे जर या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला तर ते घटनाबाह्य होईल.
शिवसेनेच्या या भूमिकेवर आता शिंदे गट काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे. यावर अद्याप राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलेलं नाहीये. मात्र आता शिंदे गटाकडून कोणती भूमिका घेतली जाणार? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.
दरम्यान, अखेर राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली. गेल्या काही दिवसांपासून यावर चर्चा सुरू होती. अखेर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
“आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग…”, मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
शिवसेनेच्या आंदोलनात लहान मुलांना पाहून भाजपने लगावला टोला, म्हणाले, शिल्लक सेनेकडे…
तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
आमदारांपाठोपाठ खासदारांचाही उद्धव ठाकरेंना धक्का, उचललं मोठं पाऊल, शिवसेनेचं काय होणार?