‘संजय राऊतजी तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है’, असं सर्वजण म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मला आर्शिवाद दिले, असं शिवसेना खासदार संजय राऊतांनी (sanjay raut) सांगितले. तसेच मला पत्रकार परिषदेच्याआधी महाविकास आघाडीमधील अनेक मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोन आले असल्याचे देखील राऊत यांनी सांगितले.
ते याबाबत शिवसेना भवनात पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. ते म्हणाले, ‘ ज्या वेळी मी म्हणालो की महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, त्या त्या वेळी माझ्या नातेवाईकांवर, कुटुंबियांवर छाडी पडल्या. माझ्या मुलांना फोन करून धमक्या दिल्या. इतकं घाणेरडं राजकारण भाजपाकडून सुरू आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
तसेच पत्रकार परिषदेची सुरुवात करताना राऊत म्हणाले, “सर्व नेते आजची ही पत्रकार परिषद बघत आहेत. मला शरद पवारांचाही फोन आला. महाविकास आघाडीतला प्रत्येक प्रमुख नेता आमच्या सोबत आहे. ही पत्रकार परिषद हे सांगण्यासाठी आहे की कितीही नामर्दानगी करून तुम्ही पाठीवर वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही.”
दरम्यान, पीएमसी बँक घोटाळ्याचा सोमय्यांकडून पुन्हा पुन्हा उल्लेख केला त्यातला मुख्य आरोपी राकेश वाधवानशी आमचे संबंध असल्याचे सांगितले. राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यात वीस कोटी गेले, पक्ष निधीच्या नावावर. मला सांगा निकॉन इन्फ्रा कंपनी कोणाची आहे? ती किरीट सोमय्यांची आहे, असे राऊत म्हणाले.
किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागिदार आहेत. किरीट समोय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतली. वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतली, अशी माहिती देखील राऊत यांनी दिली.
पुढे बोलताना राऊत यांनी सोमय्या यांचा उल्लेख दलाल असा केला आहे. ‘ठाकरे परिवाराच्या नावावर १९ बंगले आहेत, असा दावा त्या दलालाने केला आहे, मुलुंडच्या दलालाने. माझं त्याला आव्हान आहे, आपण सगळे मिळून बस करून त्या १९ बंगल्यांवर पिकनिकला जाऊ. मी देतो चाव्या. ठाकरेंच्या मालकीचे बंगले आढळले तर मी राजकारण सोडेन, असे आव्हान राऊत यांनी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
हायकोर्टाच्या आदेशानंतरही शाळेत मुली घालून आल्या हिजाब; वाद वाढण्याची शक्यता
वाचा संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे, त्यांच्या मागण्या आणि अपेक्षा
भाजपला दणका! माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने आमदारांसह केला शिवसेनेत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ
राफेलचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर: भारतापेक्षा कमी खर्चात इंडोनेशियाने विकत घेतली ४२ राफेल विमानं