राज्यात राजकीय वातावरण तापलेले असतानाच एमआयएम (MIM) पक्षाने महाविकास आघाडीशी युती करण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. यामुळे नवीन वाद निर्माण झाला असून भाजप – शिवसेनामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.
याचाच धागा पडकडत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत शिवसेनेवर निशाणा साधला होता. शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारलेलं आहे, असं फडणवीस म्हणाले होते.
फडणवीस यांच्या या टीकेवर आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर आले आहे. शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार मनिषा कायंदे यांनी ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तसेच फोटो पोस्ट करत पुरावा देखील दिला आहे. आताच जनाब या शब्दाबद्दल एवढा राग? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
ट्विटमध्ये त्या म्हणतात, ‘जनाब देवेंद्र फडणवीसजी, तेव्हा तुम्ही जनाब शब्दाबद्दल आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. चादर चढवताना आपला स्वाभिमान झुकला नाही का? आताच का या शब्दाबद्दल एवढा राग? अरे हो, १०५ आमदार निवडूनही भाजपा सत्तेत नाही, यामुळे तुमची अस्वस्थता आहे. नाही का?,” असा टोला मनिषा कायंदे यांनी लगावला आहे.
जनाब @Dev_Fadnavis जी, तेव्हा तुम्ही #जनाब शब्दाबद्दल आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. चादर चढवतांना आपला स्वाभिमान वाकला/झुकला नाही का? आताच का या शब्दाबद्दल एवढा राग? अरे हो, 105 आमदार निवडूनही @BJP4Maharashtra सत्तेत नाही, यामुळे तुमची अस्वस्थता आहे. नाही का?@ShivsenaComms #BJP pic.twitter.com/tn0j6rWZwp
— Dr.Manisha Kayande (@KayandeDr) March 20, 2022
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.शिवसेनचं हिंदुत्व महाराष्ट्राभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा असे आदेश देखील ठाकरे यांनी खासदारांना दिले आहेत. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी हा एमआयएमचा कट असल्याचं सांगत तो उधळून लावण्याचं आवाहन केलं आहे. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, विरोधक काय खुरापती करत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विरोधक विरोध करत राहणार पण आता तितक्याच ताकदीनं आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे असेही ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
‘तो’ भयावह अनुभव सांगत काश्मिरी लेखकाने मागितली माफी, म्हणाला, ‘मुस्लिमांना लाज वाटली पाहिजे’
मुलीने लव्हमॅरेज केल्याचा होता राग, १० वर्षांनंतर मुलासोबत मिळून असा काढला जावयाचा आणि त्याच्या भावाचा काटा
काश्मिर फाईल्समुळे बच्चन पांडेला बसला मोठा फटका, पहिल्या दिवशी सुर्यवंशीपेक्षा अर्धीही कमाई नाही झाली
“ज्या मलिकांनी शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवले त्याच मलिकांना वाचवायला ठाकरे पुढे आलेत”