Share

’50 वर्षात उभी केलेली शिवसेना पत्त्यासारखी कोसळतेय, रात्र रात्र झोप लागत नाही, जेवण जात नाही’

ramdas kadam

काही दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.  कदम यांनी एक पत्र लिहून आपण नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. गेल्या काही काळापासून कदम हे पक्षात नाराज असल्याची चर्चा होती.

पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर त्यांनी अखेर माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. यावेळी रामदास कदम हे भावूक झालेले पाहायला मिळाले. ‘जे 50 वर्षामध्ये उभं केलं ते आता पत्त्यांच्या पानाप्रमाणे कोसळत असल्याने आपल्याला रात्र-रात्र झोपही येत नाही,’ असं ते म्हणाले.

यावेळी बोलताना रामदास कदम म्हणाले, ‘गेल्या महिन्याभरात पक्षाची जी अवस्था झाली आहे ती पाहवत नाही तर जे 50 वर्षामध्ये उभं केलं ते आता पत्त्यांच्या पानाप्रमाणे कोसळत असल्याने आपल्याला रात्र-रात्र झोपही येत नाही. पक्षाची झालेली अवस्था सांगताना कदम भावूक झाले.

कदम यांनी शरद पवारांवर देखील टिका आहे. “शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला.” “मी खूप अस्वस्थ आहे. मी राजीनामा दिल्याने मी समाधानी नाही, आनंदी नाही. 52 वर्षे लढणारा नेता राजीनामा का देतो? याचा विचार करायला हवा. मी प्रामाणिकपणे हात जोडून आपण राष्ट्रवादीसोबत बसू नका असं सांगितलं होतं”

दरम्यान, शिवसेनेतून शिंदेंच्या नेतृत्वात बाहेर पडलेल्या गटाला पुन्हा शिवसेनेत आणणार, असा निश्चय कदम यांनी व्यक्त केला आहे. मी शिंदे आणि ठाकरेंना पुन्हा एकत्र आणणार. त्यांनी माझी हकालपट्टी केली तरी मी शिवसैनिक आहे. मी मरेपर्यंत हाती भगवाच धरणार, असे कदम यांनी म्हंटलं आहे.

याचबरोबर ‘मी वयाने मोठा आहे. पण सल्ला देण्याएवढा मोठा नाही. आपण ठाकरे आहात. साहेब गेल्यापासून बैठका घेणंच बंद केलंय. रामदास कदमदेखील शिवसैनिक आहेत. फक्त भाषणात तुम्ही बोलताय, पण प्रत्यक्षात कृतीत नाही,’ असं यावेळी बोलताना रामदास कदम म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
हातातले शिवबंधन सरणावर गेल्यावरच सुटेल; पक्ष सोडतानाही शिवसेना नेत्याची भावूक प्रतिक्रिया
तुमच्या ‘या’ सवयींमुळे वयाच्या आधीच तुम्ही दिसू शकता म्हातारे; वाचा त्यावरील उपाय …
शाहरूख आणि काजोलबद्दल उडाली ‘ही’ अफवा, ऐकल्यावर अजय देवगणलाही लागेल मिर्ची
सोशल मीडियाचा वापर करत ‘या’ चार तरुणांनी उलथवून टाकली श्रीलंकेतील राजपक्षे कुटुंबाची सत्ता

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now