अलीकडे सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांना सोशल मिडियाचे वेड लागले आहे. सोशल मिडियाचे जसे फायदे आणि मनोरंजन आहे. तसेच याचे काही मोठे तोटेही आहे. अनेक नागरिक सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करतात.
मात्र त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात, अशा अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. अशीच एक घटना जळगाव येथून समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
वाचा नेमकं प्रकरण काय..? ही घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील आहे. हेमंत दुधिया या तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले होते.
त्यानंतर काही संतप्त शिवसैनिक आणि महिला पदाधिकारी यांनी जळगावात सेंट्रल मॉल परिसरात या तरुणाला गाठलं. त्यानंतर त्याला चांगलाच चोप दिला. याचबरोबर हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, त्याला पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आले आहे. तसेच या मरहाणीचा व्हिडोही समोर आला आहे.
वाचा काय लिहिली होती त्या तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट..? या तरूणाने सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह फोटो पोस्ट केला. या फोटोत शरद पवार, उद्धव ठकारे, इम्तियाज जलील, याच्याबाबत आक्षेपार्ह अशी पोस्ट आहे. या पाठिमागे राहुल गांधीही दाखवण्यात आले आहेत. त्यानंतर आता हा मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे.
सदर व्हिडिओमध्ये सुरूवातील काही लोकांनी या तरूणाला घेराव घातल्याचे दिसून येत आहे. नंतर जमलेला सर्व घोळका त्या तरुणावर तुटून पडत आहे. आणि त्याला काही संतप्त शिवसैनिक मारहाण करताना दिसत आहे. या घटणेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बच्चन पांडे फ्लॉप झाल्यानंतर अक्षय भावूक; म्हणाला, द काश्मिर फाईल्ससला मिळालेल्या..
इंडियन आयडॉलमधून लोकप्रियता मिळवलेला सवाई भट जगतोय ‘असे’ आयुष्य, स्वत:चे घरही नाही
RRR चे खरे हिरो सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांची कहाणी माहिती आहे का?
आज आणि उद्या भारत बंद! पाहा काय काय बंद राहणार? बंदचा तुमच्यावर काय परिणाम होणार?