शिवसेनेसोबत गद्दारी करून एकनाथ गटाला समर्थन दिले, म्हणून संतोष बांगर यांच्यावर पक्षाने नुकतीच मोठी कारवाई केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांची थेट जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली. त्यानंतर बांगर आणि शिवसेना यांच्यात वाद विकोपाला गेला.
‘मला मुख्यमंत्री शिंदेंनीच सांगितलं आहे की, तुच हिंगोली सेनेचा जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे कोणत्याही पदाधिकाऱ्याला काढण्याचा अधिकार कोणालाही नसल्याच बांगर यांनी सांगितलं होतं. सोबतच त्यांनी शिवसेनेला मुंबईत शक्तिप्रदर्शन करण्याचे आव्हान दिले होते.
मात्र संतोष बांगरांना शिवसैनिकांनी दणका दिला आहे. उद्धव ठाकरेंना आव्हान देण्यासाठी मुंबईकडे निघालेल्या संतोष बांगरांकडे शिवसैनिकांनीच पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे आता उद्धव ठाकरेंपाठोपाठ शिवसैनिक देखील संतोष बांगरांवर नाराज असल्याच पाहायला मिळत आहे.
त्याचं झालं असं, आव्हान दिल्याप्रमाणे काल बांगर हे अनेक शिवसैनिकांसह मुंबईत शक्ती प्रदर्शन करण्यासाठी निघाले होते. ते आज सकाळी लोणावळ्यापर्यंत पोहचले. त्यानंतर त्यांनी एकविरा देवीच्या दर्शनाला जाण्याचे ठरविले. मात्र मुसळधार पावसामुळे त्यांना मंदिराकडे जाता आले नाही.
एवढच नाही तर, पुढे संतोष बांगर मावळ परिसरात पोहचल्यानंतर अनेक शिवसैनिकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याच पाहायला मिळालं. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारच्या विरोधात मतदान करणारे हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार आमदार बांगर हे शिंदे गटात सामील झाले. यामुळे शिवसेनेकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
ठाकरेंनी हकालपट्टी करताच गद्दार बांगरांचे थेट पक्षप्रमुखांना आव्हान, वाचा काय म्हणाले..
बांगर यांनी म्हंटलं की, ‘मला अद्याप शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे कोणतेही पत्र पोहचलेले नाही. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी हिंगोलीच्या जिल्हाध्यक्षपदी माझी नियुक्ती केली होती. याचबरोबर मला मुख्यमंत्री शिंदेंनीच सांगितलं आहे की, तुच हिंगोली सेनेचा जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे कोणत्याही पदाधिकाऱ्याला काढण्याचा अधिकार कोणालाही नाही.’
तसेच पुढे बोलताना बांगर यांनी जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती केली. ‘५५ पैकी आमदार आमच्या ओरिजन शिवसेनेत आहेत. मला कोणीही जिल्हाध्यक्ष पदावरुन काढलेले नाही,’ असं बांगर यांनी म्हंटलं आहे. मला आजही मातोश्रीबद्दल, उद्धव ठाकरेंबाबत आदर असल्याच बांगर यांनी म्हंटलं.
महत्वाच्या बातम्या :-
“आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग…”, मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
शिवसेनेच्या आंदोलनात लहान मुलांना पाहून भाजपने लगावला टोला, म्हणाले, शिल्लक सेनेकडे…
तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
आमदारांपाठोपाठ खासदारांचाही उद्धव ठाकरेंना धक्का, उचललं मोठं पाऊल, शिवसेनेचं काय होणार?