Share

…तरच आम्ही बंड मागे घेऊ; एकनाथ शिंदेंसोबत मिळून शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी मांडली भूमिका

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे सोमवारपासून ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली होती. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता पण त्यांच्याशी संपर्क साधला जात नव्हता. (shiseva mla shocking statement on thackeray government)

एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्यांच्यासोबत ३० आमदार असल्याचीही चर्चा आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांचे हे बंड महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा धक्का असू शकतो असे म्हटले जात आहे.

आता बंडखोर आमदारांनी यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिवसेनेने भाजपसोबत युती करावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती करावी, तरच बंड मागे घेण्यात येईल अशी भूमिका बंडखोर आमदारांनी मांडली आहे.

सध्या शिवसेनेचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार आहे. ते आम्हाला मान्य नाहीये. आम्ही शिवसैनिक आहोत. तसेच शिवसेना जर भाजपसोबत गेली तर आम्ही शिवसेनेसोबत असू, असे बंडखोर आमदारांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांमुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, शिवसेनेचा एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला आहे. त्यात त्यांनी काही अटी ठेवल्या आहे. प्रस्तावात त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड, संजय बांगर, आणि दादा भुसे यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक प्रस्ताव दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी या प्रस्तावात केल्याचे म्हटले जात आहे.

तसेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असावेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून आपली वर्णी लावावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या प्रस्तावामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पुढे नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-
देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री, तर मला उपमुख्यमंत्री करा; एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव
सुरतमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; एकनाथ शिंदेंना गुजरात पोलिसांनी दिली सुरक्षा, भाजप नेते भेट घेणार
भाजपकडून एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर? राजकीय घडामोडींना आला वेग

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now