Nashik: महाराष्ट्रातील सिन्नर-शिर्डी महामार्गावर (Shirdi Highway)भीषण अपघात झाला आहे. पाथरेजवळ खासगी पर्यटक बस (Bus) आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
बसमधील बहुतांश प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये सुमारे ५० लोक होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरहून साई दर्शनासाठी निघालेल्या १५ बसपैकी ही एक बस आहे.
तसेच, शुक्रवारी पहाटे साईभक्तांच्या बसचा भीषण अपघात झाला. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पोलीस जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करत आहेत.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ५ महिला, ३ पुरुष आणि २ लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातात १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णालय आणि सिन्नर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, धडक इतकी जोरदार होती की बस आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले. तर जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, हा भिषण अपघात झाल्यानंतर हळ हळ व्यक्त केली जात आहे. या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री देखील शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय या भीषण रस्ता अपघाताच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या