Share

‘पुन्हा असं व्हायला नको’, बंडखोर आमदारांवर मुख्यमंत्री शिंदे भडकले; कारणही आले समोर

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तसेच अशी चर्चा होती की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, पण देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन ही मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे सगळेच नेते हैराण झाले आहे. तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा झाल्यामुळे त्यांच्या गटात असलेल्या सर्व आमदारांनी जल्लोष साजरा केला आहे. आमदारांनी हॉटेलमध्ये तुफान डान्स केला आहे.

हॉटेलमध्ये असलेल्या टेबलावर चढून आमदारांनी डान्स केला आहे. आमदारांच्या या डान्सचा व्हिडिओ व्हायरल देखील झाला होता. शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गोव्यातील हॉटेलमध्ये त्यांच्या समर्थक आमदारांच्या एका गटाने केलेल्या नृत्यावर शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

शुक्रवारी पहाटे मुंबईत झालेल्या या शपथविधी सोहळ्यानंतर शिंदे गोव्याला हॉटेल परतले. यावेळी समर्थक आमदारांशी संवाद साधतान करताना त्यांनी त्यांच्या नृत्यावर आक्षेप नोंदवला. तसेच भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, याची काळजी घेण्यास देखील शिंदे यांनी सांगितले.

‘नागरिकांनी निवडून दिलेल्या आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या आमदारांना हे शोभत नाही. आनंदाच्या भरात अशा चुका होतात, पण खरेतर त्या व्हायला नकोत’, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक आमदार हे डान्स करताना दिसून येत आहे. त्यातले काहीजण हे थेट टेबलावर डान्स करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होता. या आमदारांसोबतच राज्यातील एकनाथ शिंदे समर्थकांनी सुद्धा जल्लोष साजरा केला होता.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now