Share

“कामाख्या देवीसाठी ४० रेडे पाठवलेत, बळी द्या”

sanjay raut

दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ‘ज्याने बाळासाहेब ठाकरेंची गद्दारी केली, तो संपला, एका बापाचे असाल तर ४० जणांनी राजीनामा द्या निवडणुकीला सामोर जा,’ असं आव्हान राऊत यांनी थेट बंडखोरांना दिलं आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले,  गुवाहाटीचे हॉटेल म्हणजे बिग बॉसचं घर. महाराष्ट्रात खरा बिग बॉस हा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत.’ तसेच ‘पुन्हा शिवसेना ताकदीने पुढे नेऊ. यापुढे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुणाच्या पालख्या वाहायच्या हे आपल्याला ठरवावं लागेल,’ असं राऊत स्पष्टच बोलले.

सध्या घडत असलेल्या राजकीय नाट्यावर संजय राऊत यांनी रोखठोक विधान केलं. ‘४० आमदारांचे मृतदेह गुवाहाटीतून येतील त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू. कामाख्या देवीसाठी ४० रेडे पाठवले आहेत. बळी द्या,’ असं खळबळजनक वक्तव्य राऊत यांनी केलं.

दरम्यान, तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित करताना बंडखोर आमदारांचा उल्लेख डुकरं केला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. ‘गुवाहाटीत डुकरं फार, त्यात इकडची चाळीस डुकरं तिकडं गेली,’ असं राऊत यांनी म्हंटलं आहे.

वाचा सविस्तर नेमकं राऊत यांनी काय म्हटलं आहे? बंडखोर आमदारांना लक्ष करताना राऊत यांची जीभ घसरली. ‘गुवाहाटीत डुकरं फार आहेत, त्यात इकडचे चाळीस डुकरं तिकडं गेली, हिंमत होती तर पाय लावून पळून का गेला?,’ असा खोचक सवाल राऊत यांना उपस्थित केला.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, ‘गुवाहतीत काय आहे? गुवाहाती कामाक्षी देवीचं मंदिर आहे. तिकडे रेड्यांचा बळी देतात. डुकरांचा बळी देत नाही. डुकरांचा बळी आपल्याला आपल्या राज्यात द्यायचा आहे. असंख्य देव देवता आपल्याकडे आहेत. ज्यांना अशा नैवध्य लागतो असा, असं राऊतांनी म्हंटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now