तर आता एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले, असून उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे यांच्या रूपाने आता राज्यात शिंदेशाही पर्वास सुरुवात झाली आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला असून जोमाने कामाला देखील सुरुवात केली आहे.
जनसंपर्क वाढविण्यास देखील शिंदे यांनी सुरुवात केली आहे. अशातच एक उद्धव ठाकरेंना धक्का देणारी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील शिवसैनिक माजी नगरसेवक नाना भानगिरेंना गळाला लावल्याचे समजते. यामुळे आता पुण्यात देखील शिवसेनेला खिंडार पडणार असल्याच बोललं जातं आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे नाना भानगिरे यांची शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या दोघांची आज सायंकाळी भेट होण्याची शक्यता आहे. लवकरच भानगिरे शिंदे गटात सामील होणार असल्याच बोललं जातं आहे. विशेष बाब म्हणजे, भानगिरे हे पुणे महापालिकेत सेनेच्या तिकिटावर तीनवेळा नगरसेवक झाले आहेत.
यामुळे आता भानगिरे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा देखील वाढल्या आहेत.चार दिवसांपूर्वी पुणे महापालिकेत प्रशासन आल्यानंतर निधी अडविल्याची तक्रार करीत भानगिरे यांनी शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिंदे यांनी तात्काळ महापालिका आयुक्त विक्रम कुमारांशी बोलून निधी देण्याचा आदेश दिला.
यामुळे भानगिरे हे शिंदेंकडे आकर्षित होऊन, त्यांच्या गटात दाखल होण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मात्र यावर अद्याप भानगिरे यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये. त्याच बरोबर एकनाथ शिंदे यांनी देखील यावर भाष्य केलेलं नाहीये. मात्र सुरू असेलेल्या चर्चानमुळे लवकरच भानगिरे शिंदे गटात सामील होतील, असं बोललं जातं आहे.
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पडण्याची शक्यता? देवेंद्र फडणवीस शरद पवारांसोबतही करणार खेळी
पैलवानांच्या तक्रारी आल्यानंतर भारतीय कुस्तीगीर संघटनेची मोठी कारवाई, शरद पवारांना धक्का
मविआ सरकार पडताच शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस; सूड घ्यायला सुरवात?
उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवून सगळी जबाबदारी एकनाथ शिंदेंला दिली त्याचा हा परिणाम- शरद पवार