Share

shinde group : शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा भर रस्त्यात भाजप नेत्यावर खुनी हल्ला; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

thane

shinde group leaders beat bjp leaders  | एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन केले. आता दोन्ही पक्ष मिळून राज्यातील सरकार चालवत आहे. त्यातून भाजप आणि शिंदे गटातील जवळीक अजून वाढत आहे, असेही पाहायला मिळत आहे. अशातच ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्लाचे समोर आले आहे. भाजपकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाचा अंतर्गत वाद समोर आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिवसेनेचे दोन मोठे गट पडले आहे. पण शिंदे गट आणि भाजप सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले आहे. अशातच शिंदे गटातील माजी नगरसेवकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

शिंदे गटाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांच्या जमावाने भाजपचे ठाण्याचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. असा प्रकार आधीही आमच्यासोबत घडला आहे. विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांनी आधी देखील गुडांच्या मदतीने आमच्यावर हल्ला केला आहे, असे प्रशांत जाधधव याचे भाऊ सिद्धेश जाधव यांनी म्हटले आहे.

तसेच ही घटना तिसऱ्यांदा घडली आहे. या हल्ल्यात प्रशांत जाधव यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या डोक्याला ९ टाके पडले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. बॅनर लावण्यावरुन हा वाद झाल्याचे समोर आले आहे.

अशाप्रकारे दहशत पसरवणाऱ्या माजी नगरसेवकांवर पोलिसही कोणती कारवाई करत नसल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार संजय केळकर भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे सिद्धेश जाधव यांनी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
ajit pawar : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, त्यांना जाणीवपूर्वक…; अजित पवार स्पष्टच बोलले 
pune : कोयते नाचवत पुण्यात टोळक्याचा धुमाकूळ; पोलिसांने असे तुडवले की सगळी मस्तीच जिरवली;पहा VIDEO..
अंत्ययात्रेच्या वेळी का म्हणतात ‘राम नाम सत्य है’? कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now