अखेर महाविकास आघाडी अल्पमतात असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टातील याचिकेत केला आहे. ३८ आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. याचबरोबर शिवसेना नेत्यांच्या जिवाला धोका असल्याचंही याचिकेत सांगण्यात आलं आहे.
यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच्या भाषणात करण्यात आलेल्या विधानाचा दाखला देण्यात आला आहे. शिवसेनेचे विधानसभेत 55 आमदार आहे. शिंदे गटाच्या या दाव्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडं 115 आमदाराच उरले आहेत.त्यामुळे विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे.
विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 144 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे दोन गट पडले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशामध्येच एकनाथ शिंदे गट आक्रमक झाला आहे. या गटाने न्यायालयात धाव घेतली असून आमदारांच्या निलंबनाची मागणी आणि गटनेता बदलण्याला विरोध दर्शविला आहे.
दरम्यान, बंडखोरांवरील कारवाईसाठी शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर शिंदे गटाने अपात्रतेसाठी १६ आमदारांना आलेल्या नोटिसा याविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या याचिकेमध्ये शिंदे गटाने आपल्याला शिवसेनेच्या ३८ हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
तसेच आपण सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. शिंदे गटाकडे शिवसेनेच्या ३९ आणि इतर १२ अशा ५१ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे या प्रकरणी आता सुप्रिम कोर्ट काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राजकीय वर्तुळात घडामोडींना प्रचंड वेग आल्याच पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
सेनेतून बंडखोरी करण्यासाठी माझ्याकडे गाड्या भरुन पैसे आले; शिवसेना आमदाराचा खळबळजनक दावा
पक्ष वाचवण्यासाठी पती उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून रश्मी ठाकरे उतरल्या मैदानात; ‘अशी’ आखली रणनीती
बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी मरण आलं तरी चालेल, पण…; एकनाथ शिंदेंनी फोडली डरकाळी
एकेकाळी मुख्यमंत्र्यांचा जाहीरपणे समाचार घेणाऱ्या खासदाराचा आता ठाकरेंना पाठिंबा; म्हणाले..