Shinde group | शिवसेना कोणाची यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात सध्या न्यायालयात वाद सुरू आहे. दुसरीकडं दोन्ही गटातील नेत्यांमध्ये चांगलाच वाद सुरू आहे. ठाकरे गटासाठी आणि शिंदे गटासाठी आजचा दिवस हा महत्वाचा दिवस आहे कारण आज दसरा आहे. दसरा मेळाव्याला शिवसेना पक्षाच्या वाटचालीत किती महत्व आहे हे पुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.
शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर आणि नवीन सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच दोन मेळावे होत आहे. इतिहासात पहिल्यांदा असं घडलं आहे. या दोन्ही मेळाव्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. कोणाचा मेळावा जंगी होणार? आणि कोणाच्या मेळाव्याला सगळ्यात जास्त पब्लिक येणार? हे काही वेळात कळेलच.
दोन्ही गटांनी जय्यत तयारी केलेली आहे. या मेळाव्यासाठी त्यांनी आपली पुर्ण ताकद लावली आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून अटीतटीचे प्रयत्न केले होते पण तसं झालं नाही. ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदान मिळालं. निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला.
त्यानंतर शिंदे गटाने बीकेसी मैदानात दसरा मेळाव्याची तयारी केली आहे. शिंदे गटातील बऱ्यापैकी आमदार हे ग्रामीण भागातील आहेत. त्यांच्यावर आता कार्यकर्त्यांना मेळाव्याला आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासाठी १७०० एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. या एसटी बसेससाठी शिंदे गटाने सुमारे १० कोटी रूपये मोजले आहेत.
बीकेसीमध्येही शिंदे गटाचा थाट दिसत आहे. व्हॅनिटी व्हॅनची सोय करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी ही व्हॅनिटी व्हॅन मागवण्यात आली आहे. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आरामदायी सोफा आहे, बेड आहे, ड्रेसिंग टेबलची सुविधा आहे. व्यासपीठावर येण्यापुर्वी एकनाथ शिंदे या व्हॅनमध्ये आराम करतील.
दुसरीकडे शिवाजी पार्क मैदानावरही दोन व्हॅनिटी व्हॅनची सोय करण्यात आली आहे. एक व्हॅनिटी व्हॅन ठाकरे कुटुंबासाठी आणि दुसरी व्हॅनिटी व्हॅन पक्षातील वरिष्ठ नेत्यांसाठी मागवण्यात आली आहे. या व्हॅनिटी व्हॅनमध्येही सोफा, बेड, ड्रेसिंग टेबलची सुविधा आहे. तसेच एकनाथ शिंदेंच्या जेवणासाठी स्पेशल किचन उभारण्यात आलं आहे. त्यांच्या जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
Shinde group : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला येणाऱ्यास मिळणार प्रत्येकी १ हजार रुपये?
accident : …अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वऱ्हाडाला घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, २० जणांचा दुर्दैवी अंत
Police Station: पत्नीचे शेजाऱ्यावर होते प्रेम, पतीने विरोध करताच त्याला दिली भयानक शिक्षा, वाचून हादरून जाल
Tata: ‘टाटा’चा हा शेअर मारतोय उसळी, कमावून देणार बक्कळ पैसा, तज्ञही म्हणाले, ‘लवकर खरेदी करून टाका ‘