Shinde group | शिवसेना कोणाची यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात सध्या न्यायालयात वाद सुरू आहे. दुसरीकडं दोन्ही गटातील नेत्यांमध्ये चांगलाच वाद सुरू आहे. ठाकरे गटासाठी आणि शिंदे गटासाठी आजचा दिवस हा महत्वाचा दिवस आहे कारण आज दसरा आहे. दसरा मेळाव्याला शिवसेना पक्षाच्या वाटचालीत किती महत्व आहे हे पुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.
शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर आणि नवीन सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच दोन मेळावे होत आहे. इतिहासात पहिल्यांदा असं घडलं आहे. या दोन्ही मेळाव्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. कोणाचा मेळावा जंगी होणार? आणि कोणाच्या मेळाव्याला सगळ्यात जास्त पब्लिक येणार? हे काही वेळात कळेलच.
दरम्यान ठाकरे गटाच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात संजय राऊतांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. संजय राऊतांना जामीन मिळू शकलेला नाही. त्यांचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढला आहे. पण दसरा मेळाव्यात त्यांची खुर्ची ठेवण्यात येणार आहे असं बोललं जात आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातही एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार आहे.
ही खुर्ची कोणाची आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता. याबाबत अशी माहिती मिळत आहे की, बीकेसी ग्राऊंडवर भव्य स्टेज उभारण्यात आलं आहे. पण स्टेजवर एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार आहे. हे आसन बाळासाहेब ठाकरेंचे असणार आहे अशी माहिती मिळाली आहे.
या वृत्ताला शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनीही दुजोरा दिला आहे. या आसनावर चाफ्याची फुलं ठेवण्यात येणार आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे आसन या मेळाव्यात खास वैशिष्ठ्ये ठरणार आहे. त्यांना पुष्पांजली वाहून बाळासाहेब ठाकरे यांची आठवण मेळाव्यात कायम ठेवली जाणार आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचा गटप्रमुखांचा मेळावा झाला तेव्हा व्यासपिठावर संजय राऊत यांची खुर्ची मोकळी ठेवण्यात आली होती. संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांची आठवण ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडूून मेळाव्यात त्यांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
Shinde group : व्हॅनिटी व्हॅन, जेवणासाठी स्पेशल किचन, दसरा मेळाव्यानिमित्त शिंंदे गटाचा ‘शिंदेशाही थाट’
Shinde group : ऐन दिवाळीच्या तोंडावर शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय; केवळ १०० रुपयात मिळणार आता ‘या’ वस्तू
Shinde group : शिंदे सरकारकडून होतोय सत्तेचा गैरवापर; शिंदे गटाच्या बड्या नेत्यानेच मान्य केली चूक