Shinde group | आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाकडूून संताप व्यक्त केला जात होता. पण आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला नाव आणि चिन्ह मिळालं आहे.
निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव ठाकरे गटाला देण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले आहे. शिंदे गटाला अदयाप चिन्ह मिळालेले नाही. त्यांचेही चिन्ह लवकरच जाहीर होईल.
शिंदे गटाने निवडणूक आयोगाला बाळासाहेब ठाकरे, बाळाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासारेब असे तीन पर्याय देण्यात आले होते. आता शिंदे गटाला चिन्हासाठी निवडणूक आयोगाला आणखी मुदत दिली आहे. त्यांना आणखी ३ पर्याय देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने आज महत्वपुर्ण निर्णय दिला आहे. पुर्ण महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागलं होतं की, दोन्ही गटांना कोणती चिन्हे मिळतील. शिंदे गटाला अदयाप कोणतेही चिन्ह मिळालेले नाही. त्यांना नवीन तीन चिन्हे सुचवा अशी सुचना देण्यात आली आहे.
दोन्ही गटांच्या वतीने आज निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे जमा करण्यात आली होती. दोन्ही गटांच्या नावातील दुसरा पर्याय निवडणूक आयोगाने मंजूर केला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी त्रिशुल या चिन्हाची मागणी केली होती. पण हे धार्मिक चिन्ह असल्याने देता येत नाही.
तर दुसरे चिन्ह म्हणजे, उगवता सुर्य हे तामिळनाडूतील पक्षाचं चिन्ह असल्याने ते चिन्हही देता येत नव्हते. त्यानंतर तिसरा पर्याय म्हणून त्यांना मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. शिंदे गटाने गदा, त्रिशुळ आणि उगवता सुर्य ही तीन चिन्हे आयोगाकडे पाठवली होती. त्यातील एकही चिन्ह आयोगाने मान्य केले नाही.
महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray : सर्वांसमोर धाय मोकलून उद्धव ठाकरे रडू लागले आणि म्हणाले की, बाळासाहेब धनुष्यबाण देव्हाऱ्यात…
politics : उद्धव ठाकरे आता थेट दिल्लीच्या तख्ताला देणार धडक; मातोश्रीवर ठरला ‘हा’ प्लॅन
MS Dhoni: क्रिकेटनंतर आता चित्रपटात आपला जलवा दाखवणार धोनी, ‘या’ भाषांमध्ये बनवणार चित्रपट
Rekha : रेखा व जया तुफान भांडत होत्या पण अमिताभची मध्ये पडण्याची डेरींग नाही झाली; कारण विषयच हार्ड होता