Share

अध्यक्ष महोदय..! राहुल नार्वेकर नवे विधानसभा अध्यक्ष; शिवसेनेचा व्हिप झुगारून शिंदे गटाचं भाजपाला मतदान

rahul narvekar
नुकतीच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडली. अवघ्या राज्याच लक्ष याकडे लागलं होतं. अध्यक्षपदासाठी भाजपाचे राहुल नार्वेकर यांच्याविरोधात शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. अखेर या निवडणुकीत शिंदे सरकारने मैदान मारलं आहे.

या निवडणुकीसाठी शिरगणती करण्यात आली असून भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड आता निश्चित मानली जात आहे. शिरगणतीमध्ये शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार केला आहे.  राहुल नार्वेकर यांना १६४ मतं मिळाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली आहेत. शिवसेनेचा व्हिप झुगारून शिंदे गटाचं भाजपाला मतदान केलं.

दरम्यान, या निवडणुकीत राहुल नार्वेकर विजयी झाले असून विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना एकूण १०७ मतं मिळाली आहेत. तसेच तीन आमदार तटस्थ राहिले असून यामध्ये समाजवादी पक्ष आणि एमआयएमचा समावेश आहे.

त्याचबरोबर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केलं. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्यासह तीन आमदारांनी भाजपाच्या राहुल नार्वेकर यांना मतदान केलं.

नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानतंर सभागृहात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांना खुर्चीपर्यंत नेलं. भाजप नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

दरम्यान, शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांनी बोलावलेले विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. आज पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. यात नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंकडून अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now