Share

संभाजीनगर नाही औरंगाबादच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नामांतराला दिली स्थगिती

Eknath Shinde

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे हे सरकार पडणार असल्याचा अंदाज महाविकास आघाडीला आला होता. त्यामुळे त्यांनी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले होते. (shinde government stay renaming of auranagaabad as sambhajinagar)

त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे नामांतर धाराशिव असे करण्यात आले होते. तसेच नवी मुंबईच्या विमानतळाला दी बा पाटील यांचे नाव देण्यात आले होते. पण त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता.

आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहे, तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहे. त्यामुळे त्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे. सध्या औरंगाबाद, उस्मानाबाद आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराला स्थगिती देण्यात आली आहे. शिंदे सरकार नव्याने हे निर्णय घेणार आहे.

महाविकास आघाडी सरकारने अखेरच्या क्षणी नियमबाह्यपणे हे निर्णय घेतले असून ते स्थगिती करुन नव्याने निर्णय घेतले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करण्याचं पत्र सरकारला दिलं होतं, त्यामुळे त्यांनी घेतलेली कॅबिनेटची बैठक ही नियमबाह्य होती, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले होते.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर असे करण्यात यावे अशी मागणी केली जात होती. तसेच उस्मानाबादचे नामांतर करुन धाराशिव करावे अशी मागणी केली जात होती. त्यामुळे ठाकरे सरकारने आपल्या शेवटच्या बैठकीत हे प्रस्ताव मंजूर केले होते.

ठाकरे सरकार कोसळण्याआधी २९ जून रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीतच हे नामांतराचे निर्णय घेण्यात आले होते. पण त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यावर आक्षेप घेत हे निर्णय बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ‘हा’ खेळाडू बनणार रोहितचे शस्त्र, इंग्लंडला टाकणार संकटात
‘सलमानने मला लग्नासाठी विचारलं तर मी नाही म्हणणार नाही’, अभिनेत्रीचं हैराण करणारं वक्तव्य
‘हे’ दोघंच अख्खा महाराष्ट्राचे मालक; अजित पवार यांचा टोला

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now