पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढताना दिसून येत होत्या. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक त्रस्त झाला होता. त्यानंतर मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती केंद्र सरकारने अनुक्रमे ९.५ आणि ७ रुपयांनी कमी केल्या होत्या. (shinde government reduce petrol and diesel price)
केंद्र सरकारने पेट्रोलच्या किंमती कमी केल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारलाही पेट्रोलचे भाव कमी करावे असे भाजप नेते सांगताना दिसून येत होते. आता भाजपसोबत एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर लगेचच त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. पेट्रोलच्या दरात ५ रुपयांनी तर डिझेलच्या दरात ३ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
महागाईमुळे नागरिक त्रस्त होते, पण सरकारच्या या निर्णयामुळे आता सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नव्या सरकारने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दर कमी करण्याबाबत आधीच सांगितले होते. आता या निर्णयाला सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली होती. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. तसेच वेगवेगळ्या विकास कामांवर आणि योजनांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे .
केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्यानंतर काही राज्यांनी त्यांच्या इंधनाच्या किंमती कमी केल्या होत्या. पण महाविकास आघाडी सरकारने ते केले नाही. पण आता नवीन युतीच्या सरकारने इंधनावरचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलचे दर पाच रुपयांनी आणि डिझेलचे दर तीन रुपयांनी कमी होणार आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर सहा हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: तुम्ही ३ महिने माझं डोकं खात आहात, आता खुश आहात का? रणबीरला भेटताच नीतू कपूर खुश
सारा अली खानसोबत गोवा ट्रिपला गेल्यानंतर काय काय झालं? जान्हवी कपूरने उघड केले रहस्य
ग्लोबल टिचर डिसले गुरूजींना धक्का! राजीनामा दिला तरी आतापर्यंतच्या पगाराची वसूली होणार