शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय घटनाबाह्य? वाचा तज्ज्ञांनी काय म्हंटलंय?

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार मोठ्या जोमाने कामाला लागलं आहे. राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठं – मोठे निर्णय घेताना पाहायला मिळत आहे. आधीच्या सरकारने घेतल्या निर्णयांना स्थगिती देखील नव्या सरकारकडून देण्यात येत आहे.

नुकतच शिंदे सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र  दोनच मंत्री असलेल्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाला घटनात्मक वैधता नाही, असा आरोप केला जातं आहे.  विचारवंत हरी नरके यांनी देखील याबाबत भाष्य केलं आहे.

याचबरोबर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याची दखल घेत आता राज्यपालांना सवाल केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी लिहिले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या कलम १६४ १A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान १२ मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे.

तसेच पुढे लिहिले आहे की, १२ पेक्षा कमी संख्येच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले २ आठवडे महाराष्ट्रात २ मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही राज्यपाल, हे काय सुरू आहे? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तर जाणून घेऊया..  घटनातज्ज्ञ असिम सरोदे यांचं याबद्दल काय मत.

याबद्दल बोलताना घटनातज्ज्ञ सरोदे यांनी म्हंटलं आहे की, ‘संविधानातील कलम 164 [1-A] नुसार राज्यातील एकूण मंत्र्यांची संख्या ही एकूण विधानसभा सदस्याच्या १५ टक्के किंवा किमान १२ असणे आवश्यक आहे. तसेच संविधानाच्या या तरतुदीमध्ये ‘Council Of minister’ अशा शब्द वापरला असल्याच त्यांनी म्हंटलं आहे.

याचबरोबर पुढे घटनातज्ज्ञ सरोदे हे म्हणतात की, ‘मंत्रिमंडळात १२ किंवा १५ मंत्री असणं आवश्यक आहे.  मात्र असं असलं तरी देखील संविधानाच्या या तरतुदीचा संपूर्ण पद्धतीने अर्थ काढावा लागतो. यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय अनियमित ठरतात पण त्यांना बेकायदेशीर म्हणता येणार नाही.

दरम्यान, घटनातज्ज्ञ सरोदे यांनी स्पष्टच सांगितलं आहे की, ‘घटनेच्या तत्वाशी दोनच मंत्र्यांनी राज्य चालवणं हे सुसंगत नाही. मात्र ते बेकायदेशीर आहे असंही आपल्याला म्हणता येणार नाही. यामुळे सध्या शिंदे सरकारमध्ये अनियमितता आहे हे जरी खरं असलं तरी देखील त्याला आपण बेकायदेशीर किंवा अवैध म्हणू शकतं नाही.

महत्वाच्या बातम्या-
भगवान शंकराप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विष प्राषण केलंय; अमित शहा असं का म्हणाले? जाणून घ्या..
भगवान विष्णुचे मंदिर पाडून दिल्लीची जामा मशिद उभारली, दावा खोटा निघाला तर कोणतीही सजा द्या
या पर्वतावर अजूनही आहे भगवान शंकराचे वास्तव, दिवसरात्र येत असतो ओम असा आवाज, वाचून आश्चर्य वाटेल
अरे देवा! कोर्टाने भगवान शंकरालाच बनवले आरोपी, कोर्टात हजर राहण्याची दिली नोटीस, मग भक्तांनी..