Share

पती राज कुंद्राला सोडून ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात पडलीये शिल्पा शेट्टी, स्वत:च खुलासा करत म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा पडद्यावर झळकली आहे. तिच्या ‘निकम्मा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. अशा परिस्थितीत शिल्पा तिच्या चित्रपटाच्या टीमसोबत चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. यावेळी प्रमोशन करताना तिने अनेक गुपिते उघड केली आहे. (shilpa shetty talk about thier crush)

शिल्पा शेट्टीला फिटनेसमुळे ओळखले जाते. तिचे फिटनेस आजकालच्या अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसून येते. तिच्या आयुष्यात नक्की काय सुरु आहे हे सर्वांना जाणून घ्यायचे असते. आता एका ठिकाणी प्रमोशन करताना तिने जाहीरपणे आपल्या क्रशबद्दल सांगितले आहे.

शिल्पाने अलीकडेच त्या अभिनेत्याचे नाव उघड केले आहे ज्यावर सध्या तिचा क्रश आहे. तो अभिनेता सध्या बॉलिवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देत असून त्याची फॅन फॉलोविंग सुद्धा खुप जास्त आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, शिल्पा शेट्टीचा क्रश दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा हँडसम हंक कार्तिक आर्यन आहे.

झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, शिल्पाने एक रॅपिड-फायर राउंड खेळला जिथे तिने स्वतःबद्दल अनेक मनोरंजक गोष्टी उघड केल्या. यावेळी जेव्हा शिल्पाला विचारण्यात आले की तिला बॉलिवूडमध्ये कोण आवडते. या प्रश्नावर शिल्पाने कार्तिक आर्यनचे नाव घेतले.

याशिवाय या मुलाखतीत शिल्पाला तो काळ आठवला, जेव्हा तिची आई सुनंदा यांनी तिचा निकाल पाहून शिल्पाला चुकीची आणि एकदम फालतू म्हटले होते. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने सांगितले की, ‘जेव्हा माझ्या आईने माझा निकाल पाहिला तेव्हा ती माझ्यावर खुप ओरडली आणि म्हणाली की तू पूर्णपणे मूर्ख आहे आणि कोणत्याच कामाची नाहीये.

दरम्यान, शिल्पाच्या ‘निकम्मा’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात शिल्पाशिवाय अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटिया देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात शिल्पा एका सुपरवुमनच्या भूमिकेत दिसणार आहे. निकम्मा १७ जूनला प्रदर्शित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-
सहा वर्षांनंतर तरुणाच्या कुटुंबाला मिळाला न्याय; २८ रुपयांसाठी गमावला होता जीव, आता मिळणार ४३ लाख
शेतकऱ्याकडून साईचरणी ५ हजार किलो केशर आंब्याचे दान, किंमत वाचून डोळे पांढरे होतील
पुणेकर ऋतुराज गायकवाडने दाखवले पुणेरी गुण; खोडी काढणाऱ्या चहलची घेतली ‘अशी’ फिरकी, पाहा व्हिडीओ

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now