Share

शिखर धवनला वडिलांनी पोलिसांसमोरच केली लाथा-बुक्क्यांनी मारहाण, धक्कादायक कारण आले समोर

चार संघांनी आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पहिला क्वालिफायर खेळला गेला, ज्यामध्ये राजस्थानचा पराभव करून पहिल्यांदाच आयपीएल खेळणाऱ्या गुजरात टायटन्सच्या संघाने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे.

लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज एलिमिनेटर खेळला जात आहे. मात्र, बंगळुरूसाठी प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा मार्ग सोपा नव्हता. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याच्या निकालावर ते अवलंबून होते, जिथे दिल्ली हरली आणि नंतर बेंगळुरूने प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

बंगळुरूचे १६ गुण होते, तर दिल्लीचे १४ गुण होते. दिल्लीने शेवटचा सामना जिंकला असता तर त्यांच्या रनरेटमुळे ते प्लेऑफमध्ये पोहोचले असते. आणखी एक संघ होता, ज्याने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. संघ खूपच मजबूत होता. मात्र सामन्यांमध्ये संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.

आम्ही पंजाब किंग्सबद्दल बोलत आहोत, ज्यांनी लीग टप्प्यात चांगली सुरुवात केली, परंतु नंतर त्यांची कामगिरी चांगली झाली नाही आणि प्लेऑफमधून बाहेर पडण्याचा फटका त्यांना सहन करावा लागला. संघात धवन, बेअरस्टो, राजपक्षे, मयंक आणि लिव्हिंगस्टोनसारखे स्टार फलंदाज होते.

दिल्लीची गोलंदाजीतही ताकद चांगली होती. याचदरम्यान, संघाचा स्टार फलंदाज शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचे वडिल त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ धवनने केवळ मनोरंजनासाठी बनवला असला तरी हा व्हिडीओ पाहून अनेक जण पोट धरून हसत आहेत.

इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना शिखर धवनने कॅप्शन लिहिले की, नॉक आऊटमध्ये सिलेक्ट न झाल्यामुळे वडिलांनी मला नॉक आऊट केलं. शिखर धवनसाठी हा आयपीएल हंगाम चांगला गेला आहे. पंजाब किंग्जचा सलामीवीर धवनने 14 सामन्यांत 38.33 च्या सरासरीने 460 धावा केल्या आहेत.

शिखर धवन आयपीएलमध्ये सातत्याने धावा करत आहे. गेल्या 7 हंगामात तो सलग 450 हून अधिक धावा करत आहे. मात्र, या कामगिरीचे बक्षीस त्याला मिळाले नाही आणि आगामी मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. त्याला संघात स्थान न मिळाल्याने सुरेश रैना निवड समितीवरही संतापला होता.

महत्वाच्या बातम्या
. संघात निवड न झाल्यामुळे शिखर धवनला वडिलांनी सर्वांसमोर लाथा बुक्यांनी चोपले; पहा व्हिडिओ
VIDEO: जिल्ह्याला आंबेडकरांचे नाव देण्यावरून उडाला भडका; जमावाने मंत्र्याचे आणि आमदाराचे घर पेटवले
VIDEO: जिल्ह्याला आंबेडकरांचे नाव देण्यावरून उडाला भडका; जमावाने मंत्र्याचे आणि आमदाराचे घर पेटवले
दाऊदची बहीन हसीना पारकरचा बॉडीगार्ड राष्ट्रवादीचा कार्यकर्ता; ईडीच्या दट्ट्यानंतर मलिकांची कबुली

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now