Share

शिखर धवनला वडीलांशी पंगा घेणे पडले महागात, वडीलांनी दिली कानाखाली, पहा व्हिडीओ

टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शिखर धवन (shikhar dhawan) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो फोटो-व्हिडिओ शेअर करत राहतो, तर कधी त्याच्या सहकारी खेळाडूंसोबत डान्स करताना तो व्हिडीओ पोस्ट करत असतो. यावेळी त्याने इंस्टाग्रामवर (instagram) वडिलांसोबतची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याचे वडील त्याच्या कानाखाली मारतात. (shikhar dhawan and his father video viral)

या व्हिडिओमध्ये शिखर धवन आपल्या वडिलांसोबत मस्ती करताना दिसत आहे, त्यादरम्यान त्याचे वडील शिखर धवनला कानशिलात लगावतात. ही एक मजेदार व्हिडिओ क्लिप आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे. त्याचबरोबर 3 हजारांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की धवनचे वडील त्यांच्या खोलीतून बाहेर येतात आणि पंजाबीमध्ये विचारतात, क्या तुम अंदर घुमकर आए हो? यावर धवन गमतीने विचारतो, वॉरंट लाए हो, सबूत है तुम्हारे पास? दुसऱ्याच क्षणी त्याचे वडील त्याच्या कानशिलात लगावतात आणि त्याला फरशी पुसायला लावतात.

धवन त्याच्या गालावर हात ठेवतो आणि निमुटपणे खोलीत जातो. त्यांचा हा व्हिडीओ सध्या खुप पसंत केला जात आहे. माजी ऑफस्पिनर भज्जीने या व्हिडिओवर कमेंट केली आहे. त्याने ‘बेस्ट’ लिहून टिप्पणी केली. त्याचवेळी आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने हसणारी इमोजी कमेंटमध्ये शेअर केली आहे.

याशिवाय बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि हुमा कुरेशी यांनीही कमेंट केली आहे. शिखर धवन नेहमी त्याच्या सोशल मिडीयावरील व्हिडीओमुळे चर्चेत असतो. तो नेहमी काहीना काही पोस्ट करत असतो. शिखर धवनने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील 2 सामन्यात अर्धशतके झळकावली.

पार्लमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 79 धावा केल्या होत्या, तर केपटाऊनमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 61 धावा केल्या होत्या. मात्र, भारतीय संघ या मालिकेत एकही वनडे जिंकू शकला नाही आणि भारताला 0-3 असा पराभव पत्करावा लागला. आता संघामध्ये काय बदल केले जातील याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या
राष्ट्रवादीच्या आमदारानं सगळ्या तालुकाध्यक्षांना वाटल्या चारचाकी गाड्या; अजितदादांच्या हस्ते चाव्या वाटप
भन्नाट ऑफर! एक बाटली रक्त द्या आणि एक किलो चिकन घ्या, रक्तदान करण्यासाठी लोकांना दिली प्रेरणा
‘इथे ठाकरे सरकार आहे, दंगल करून दाखवाच’; दंगलीची भाषा करणाऱ्या भाजपला राऊतांचा इशारा
भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या ईडीने दिली शिवसेना आमदाराला ऑफर; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

खेळ

Join WhatsApp

Join Now