Politics: सकल हिंदू समाजाच्या वतीने मागील काही दिवसांत विविध मागण्यांसाठी मोर्चे निघाले आहेत. लव्ह जिहाद, गोहत्या व धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा. अशी त्यांची मुख्य मागणी आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून देखील विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान भाजपा नेते आशिष शेलार यांनी देखील यासंबंधी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे.
लव्ह जिहाद विरोधात सरकारने कायदा बनवावा. या कायद्याला नागरीकांनी सुद्धा समर्थन द्यावे असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये सांगितले आहे. लव्ह जिहादच्या घटनांमुळे सामाजिक बांधिलकी आणि ऐक्याला तडा जात असल्याने, सरकारने यासाठी कायदा बनवावा असे आशिष शेलार यांचे मत आहे.
याशिवाय राज्यातील महिला व मुलींकडून समोर येणाऱ्या माहितीमधून ‘एका विशिष्ट वर्गाकडून त्यांच्यावर रोज अन्याय अत्याचार केला जातो’ असे स्पष्ट दिसतं आहे. तसेच हिंदू मुली या लोकांना खेळाचे साधन वाटत आहे का ? असा प्रश्न देखील आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
या लोकांना फक्त हिंदू धर्मातील मुली, महिला व भगिनी यांच्यावरच अन्याय करावा वाटतो काय ? असे म्हणत आशिष शेलार यांनी संतप्त भूमिका मांडली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या एका मूलाखतीमध्ये सुद्धा आशिष शेलार यांनी लव्ह जिहादचा मुद्दा मांडला होता. यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“लव्ह जिहाद व साखळी बॉम्बस्फोट धमकी यावर ठाकरे अजूनही गप्प आहेत. एका विशिष्ट वर्गाच्या मतासाठी उद्धव ठाकरे बोटचेपी भूमिका घेत आहेत,” असे म्हणत आशिष शेलार यांनी थेट ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंकजा मुंडे राजकारणातून संन्यास घेणार? स्वत:च म्हणाल्या, ‘संधी मिळत नसल्याने सन्मानाने बाहेर पडणे..
- BJP : भाजपमध्ये महीला सेफ नाहीत म्हणत महीला नेत्याने दिला राजीनामा; उर्फी चित्रा वाघांना डिवचत म्हणाली आता..
- VED : प्रेक्षकांचे प्रेम पाहून रितेश-जिनिलिया भावूक; ‘वेड’ची ९ व्या दिवशी तुफान कमाई, आकडा पाहून थक्क व्हाल