Share

PHOTO: लेहंगा-चोलीमध्ये फोटो शेअर करत शहनाज म्हणाली, दिवस कसा आहे? चाहते म्हणाले..

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मित निधनाने सर्वांचं धक्का बसला होता. सिद्धार्थ हा ‘बिग बॉस’ सीजन १३ चा विजेता आहे. याच शो दरम्यान सिद्धार्थ आणि शहनाजची मैत्री झाली होती. तेव्हा पाहूनच चाहत्यांना ही जोडी खूप आवडायची. या जोडीला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे. आज ही चाहत्यांच्या मनात यांना स्थान आहे. तेव्हा पाहूनच सिद्धार्थ आणि शहनाज हे एकत्र होते. मात्र सिद्धार्थच्या निधनाने शहनाज पूर्णपणे खचली होती.

मात्र आता ती या धक्क्यातून स्वतःला सावरत आहे. त्याचबरोबर शहनाज सध्या सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसते. पण ती आपले नविन व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत असते. अशाच एका फोटोशूटचे काही फोटो शहनाजने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शुक्रवारी (२१ जानेवारी) शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू झाला आहे.

शहनाजने पिवळ्या रंगाचा लेहेंगा घातला आहे आणि तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोतील तिच्या अदाकारीने तिने आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. या फोटोंमध्ये शहनाजने सुंदर अशी एम्ब्रॉयडरी असलेला लेहेंगा-चोली घातला आहे. तर तिचे चाहते तिचा हा लूक परफेक्ट असल्याचे सांगत आहेत.

शहनाजचा हा ड्रेस एकदम रॉयल दिसत आहे. ती कॅमेऱ्यासाठी एकदम सुंदर पोज देत आहे. त्याचबरोबर तिने कॅप्शनमध्ये चाहत्यांना विचारते आहे की, ‘दिवस कसा आहे?’ तर यावर एका चाहत्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, दिवस तर सुंदर आहे, पण तू जास्त सुंदर आहेस. त्याचबरोबर शहनाजने या लूकसाठी हलका मेकअपही केला आहे. तिचा हा मेकअप तिच्या ड्रेसला शोभून दिसत आहे. शहनाजने सोनेरी रंगाचा सुंदर असा हार आणि काही अंगठ्या घातल्या आहेत. त्यामुळे तिचा हा लुक चाहत्यांना खुपच आवडला आहे.

शहनाज ही ‘बिग बॉस’ या शो पासून खूप प्रसिद्ध झाली. चाहत्यांना तिचा खोडकरपणा खूप आवडायचा. त्याचबरोबर ती नेहमी आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत होती. शहनाजचे इंस्टाग्रामवर १०.७ मिलियनपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. इतकेच नव्हे तर तिच्या प्रत्येक बातमीकडे चाहत्यांचे लक्ष असते. शहनाजचे फोटो इंटरनेटवर व्हायरल व्हायला वेळ लागत नाही.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज पुर्णपणे खचली होती. सध्या शहनाजही सार्वजनिक ठिकाणी देखील खूप कमी दिसते. त्याचबरोबर शहनाज लवकरच ‘हुनरबाज: देश की शान’ या शोमध्ये दिसणार आहे. ज्याच्या प्रोमो व्हिडिओमध्ये शहनाज ‘शेरशाह’ या चित्रपटातील ‘रांझा’ हे हिट गाणे गाताना दिसत आहे. शहनाज ही फक्त अभिनेत्री नसून ती पंजाबमधील एक प्रसिद्ध गायिका देखील आहे. ‘हुनरबाज’ या शोच्या मंचावर ती तिचे गाण्याचे कौशल्य दाखवणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या
‘वापरून टाकून द्यायला मी काय टिशू पेपर आहे का?’ राखी सावंत बिग बॉसवर संतापली, पहा व्हिडीओ
वाढदिवसाच्या दिवशीच श्रेयस तळपदेने चाहत्यांना दिले खास गिफ्ट, ‘या’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
राजकुमार रावने पत्नीसोबत शेअर केला मिरर सेल्फी, युजर्सनी अश्लील कमेंट केल्यानंतर डिलीट केली पोस्ट
‘नवाब मलिकांनी पाकिस्तानाच जावं, तिकडे टिपू सुल्तान नावाचा रस्ता आहे’, निलेश राणेंची खोचक टीका

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now